S M L

चिदंबरम यांनी राजीनाम्याची भाजपची मागणी

16 डिसेंबरआयबीएन नेटवर्कने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याविषयी दिलेल्या बातमीचे पडसाद आजही संसदेत उमटले. पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोप करत भाजप खासदारांनी पी. चिदंबरम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. चिदंबरम यांनी गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करत दिल्लीतल्या एका हॉटेल मालकाविरोधातले गुन्हे मागे घ्यायला दबाव टाकल्याचा खुलासा आयबीएन नेटवर्कने केला होता. यावरुन काल आणि आज दोन्ही दिवस विरोधकांनी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. पण चिदंबरम यांनी सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. गुन्हे मागे घेण्याचा आदेश संचालकांनी काढला. त्याची कुणालाच कल्पनाही नव्हती. याप्रकरणी कुठलाच निर्णय घेऊ नये, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे भाजपच्या आरोपांचे मी खंडन करतो असं स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिलं. या आरोपांमुळे अत्यंत व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 05:33 PM IST

चिदंबरम यांनी राजीनाम्याची भाजपची मागणी

16 डिसेंबर

आयबीएन नेटवर्कने केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्याविषयी दिलेल्या बातमीचे पडसाद आजही संसदेत उमटले. पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोप करत भाजप खासदारांनी पी. चिदंबरम यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. चिदंबरम यांनी गृहमंत्री पदाचा दुरुपयोग करत दिल्लीतल्या एका हॉटेल मालकाविरोधातले गुन्हे मागे घ्यायला दबाव टाकल्याचा खुलासा आयबीएन नेटवर्कने केला होता. यावरुन काल आणि आज दोन्ही दिवस विरोधकांनी चिदंबरम यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. राज्यसभेत झालेल्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे. पण चिदंबरम यांनी सर्व आरोपांचे खंडन केलं आहे. गुन्हे मागे घेण्याचा आदेश संचालकांनी काढला. त्याची कुणालाच कल्पनाही नव्हती. याप्रकरणी कुठलाच निर्णय घेऊ नये, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे भाजपच्या आरोपांचे मी खंडन करतो असं स्पष्टीकरण चिदंबरम यांनी दिलं. या आरोपांमुळे अत्यंत व्यथित झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 05:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close