S M L

खर्‍या 'सिंघम' साठी नागरिकांची 'सटकली' !

16 डिसेंबरएक मराठी आयपीएस अधिकारी सध्या बिहारमधल्या पाटणा शहरातल्या लोकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. एकीकडे प्रांतवादाचे राजकारण सुरू असताना एका मराठी पोलीस अधिकार्‍याची पाटणा शहरातून झालेली बदली रद्द व्हावी यासाठी इथले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले आहे. मुळचे अकोला जिल्हातील पारसचे शिवदीप लांडे बिहारमध्ये 'सिंघम' म्हणून लोकप्रिय झालेत. सिंघममधला बाजीराव सिंघम पडद्यावर झळकतो आणि असाच असाच अधिकारी आपल्या शहरात असावा अशी नागरिकांची अपेक्षा असते.आणि बिहारमध्येही असाच एक सिंघम प्रत्यक्षात आहे. शिवदीप लांडे....मूळचे मराठी असलेले लांडे बिहारमध्ये एसपी पदावर काम करत आहे. गुंडांवरील धडक कारवाईमुळे ते इथल्या तरुणांचे आदर्श बनले आहेत. 'लांडे साब जैसा कोई नही हमे वही शिवदीप लांडेही चाहिये' अशी मागणी येथील नागरीक करत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा दरारा निर्माण करणार्‍या शिवदीप लांडे यांच्या कामाची दखल घेत पाटण्याच्या एसपीपदी आणले. लांडे यांनी पाटण्यातील वाढते दरोडे, मुलींची छेडछाड, अपहरण, खंडणी आणि खुन यांसारख्या गंभीर गुन्हेगारीला त्यांच्या दहा महिन्याच्या कारकीर्दत हद्दपार केले. पाटण्यातील बहुतेक लोकांजवळ लांडे यांचा मोबाईल नंबर आहे. कुणीही व्यक्ती चौवीस तास थेट त्यांच्या फोनवर संपर्क करु शकते आणि ते चौवीस तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात. काही दिवसांपूर्वी शिवदीप लांडेंची पाटण्यातून बदली करण्यात आली. आणि या निर्णयाने नाराज पाटण्यातील हजारो नागरिक त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी रस्त्यावर उतरले. तर फेसबुकवरही अनेकांनी आपला विरोध नोंदवला आहे. दयाकुमार सिंग म्हणतो, वो हमारे सिघंम हे...उनेक वजहसे आज पाटणा के नागरिक सुरक्षित है उन्हे वापस बुलाना चाहिये. तर शिवदीप लांडे म्हणतात, मी देशात कुठेही सेवा करण्यास तयार आहे, शेवटी हा देशाच्या सेवेचा प्रश्न आहे.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिवदीत लांडे यांनी आयपीएसपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. शिक्षण सुरु असतांना घरचे जीवन हलाखीत काढले, घरात तेंव्हा लाईट सुध्दा नव्हती असं खुद्द शिवदीप लांडे सांगतात.एकीकडे मराठी विरुद्ध बिहारी असा वाद पेटला असताना एक मराठी माणुस बिहारी लोकांच्या मनात घर करतो याचं कारण आहे त्याने गुन्हेगारीवर बसवलेला वचक...एकूणच फक्त सिनेमात दिसणारा आदर्श पोलीस अधिकारी प्रत्यक्षातही असू शकतो हे यानिमित्ताने पुन्हा समोर आलं आहे. कर्तव्यदक्षता आणि आदर्श अधिकार्‍यांविषयी नागरिकांना वाठणारी आस्था याला प्रांताच्या मर्यादा असू शकत नाहीत हेही शिवदीप लांडेंनी सिद्ध केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 16, 2011 05:46 PM IST

खर्‍या 'सिंघम' साठी नागरिकांची 'सटकली' !

16 डिसेंबर

एक मराठी आयपीएस अधिकारी सध्या बिहारमधल्या पाटणा शहरातल्या लोकांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. एकीकडे प्रांतवादाचे राजकारण सुरू असताना एका मराठी पोलीस अधिकार्‍याची पाटणा शहरातून झालेली बदली रद्द व्हावी यासाठी इथले सर्व नागरिक रस्त्यावर उतरले आहे. मुळचे अकोला जिल्हातील पारसचे शिवदीप लांडे बिहारमध्ये 'सिंघम' म्हणून लोकप्रिय झालेत.

सिंघममधला बाजीराव सिंघम पडद्यावर झळकतो आणि असाच असाच अधिकारी आपल्या शहरात असावा अशी नागरिकांची अपेक्षा असते.आणि बिहारमध्येही असाच एक सिंघम प्रत्यक्षात आहे. शिवदीप लांडे....मूळचे मराठी असलेले लांडे बिहारमध्ये एसपी पदावर काम करत आहे. गुंडांवरील धडक कारवाईमुळे ते इथल्या तरुणांचे आदर्श बनले आहेत. 'लांडे साब जैसा कोई नही हमे वही शिवदीप लांडेही चाहिये' अशी मागणी येथील नागरीक करत आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी नक्षलग्रस्त भागात पोलिसांचा दरारा निर्माण करणार्‍या शिवदीप लांडे यांच्या कामाची दखल घेत पाटण्याच्या एसपीपदी आणले. लांडे यांनी पाटण्यातील वाढते दरोडे, मुलींची छेडछाड, अपहरण, खंडणी आणि खुन यांसारख्या गंभीर गुन्हेगारीला त्यांच्या दहा महिन्याच्या कारकीर्दत हद्दपार केले. पाटण्यातील बहुतेक लोकांजवळ लांडे यांचा मोबाईल नंबर आहे. कुणीही व्यक्ती चौवीस तास थेट त्यांच्या फोनवर संपर्क करु शकते आणि ते चौवीस तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात.

काही दिवसांपूर्वी शिवदीप लांडेंची पाटण्यातून बदली करण्यात आली. आणि या निर्णयाने नाराज पाटण्यातील हजारो नागरिक त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी रस्त्यावर उतरले. तर फेसबुकवरही अनेकांनी आपला विरोध नोंदवला आहे.

दयाकुमार सिंग म्हणतो, वो हमारे सिघंम हे...उनेक वजहसे आज पाटणा के नागरिक सुरक्षित है उन्हे वापस बुलाना चाहिये. तर शिवदीप लांडे म्हणतात, मी देशात कुठेही सेवा करण्यास तयार आहे, शेवटी हा देशाच्या सेवेचा प्रश्न आहे.अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतून शिवदीत लांडे यांनी आयपीएसपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. शिक्षण सुरु असतांना घरचे जीवन हलाखीत काढले, घरात तेंव्हा लाईट सुध्दा नव्हती असं खुद्द शिवदीप लांडे सांगतात.

एकीकडे मराठी विरुद्ध बिहारी असा वाद पेटला असताना एक मराठी माणुस बिहारी लोकांच्या मनात घर करतो याचं कारण आहे त्याने गुन्हेगारीवर बसवलेला वचक...

एकूणच फक्त सिनेमात दिसणारा आदर्श पोलीस अधिकारी प्रत्यक्षातही असू शकतो हे यानिमित्ताने पुन्हा समोर आलं आहे. कर्तव्यदक्षता आणि आदर्श अधिकार्‍यांविषयी नागरिकांना वाठणारी आस्था याला प्रांताच्या मर्यादा असू शकत नाहीत हेही शिवदीप लांडेंनी सिद्ध केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2011 05:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close