S M L

...तर 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण - अण्णा

17 डिसेंबरलोकपाल विधेयकाच्या मुद्दावर अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अण्णांनी लोकपाल विधेयक या अधिवेशनात आलं नाही तर नाइलाजास्तव 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा दिला. त्याचबरोबर अण्णांनी या पत्रात स्थायी समितीने दिलेल्या अहवालावर टीका केली. तसेच गेल्या वर्षभरात सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात दिलेली अनेक आश्वासन आणि त्यानंतर प्रत्येकवेळी सरकारकडून मिळालेला धोका याबाबद्दलही अण्णांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. संसदेने आश्वासन देऊनसुद्धा ही नागरिकांची सनदेचा लोकपालात समावेश न करता हे वेगळं विधेयक आणलं गेलं, लोकपालाची निवड प्रक्रीया, सीबीआयचा मुद्दा या सगळ्या मुद्दयांसदर्भात आण्णांनी पुन्हा एकदा आग्रही भूमिका घेतली आहे. लोकपालच्या मुद्यावरून देशभऱ आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालवरची चर्चा संसदेत बसून ऐकणार आहेत. 19,20 आणि 21 डिसेंबरला ही चर्चा होण्याची शक्यता असून अण्णा लोकसभेच्या व्हिजिटर्स गॅलरीत बसून ही चर्चा ऐकणार आहेत. सोमवारीच लोकपाल विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता असून त्याच दिवशी ते लोकसभेत मांडलं जाईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2011 09:37 AM IST

...तर 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण - अण्णा

17 डिसेंबर

लोकपाल विधेयकाच्या मुद्दावर अण्णा हजारे यांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात अण्णांनी लोकपाल विधेयक या अधिवेशनात आलं नाही तर नाइलाजास्तव 27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करावे लागेल असा इशारा दिला. त्याचबरोबर अण्णांनी या पत्रात स्थायी समितीने दिलेल्या अहवालावर टीका केली.

तसेच गेल्या वर्षभरात सरकारने लोकपाल विधेयकासंदर्भात दिलेली अनेक आश्वासन आणि त्यानंतर प्रत्येकवेळी सरकारकडून मिळालेला धोका याबाबद्दलही अण्णांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. संसदेने आश्वासन देऊनसुद्धा ही नागरिकांची सनदेचा लोकपालात समावेश न करता हे वेगळं विधेयक आणलं गेलं, लोकपालाची निवड प्रक्रीया, सीबीआयचा मुद्दा या सगळ्या मुद्दयांसदर्भात आण्णांनी पुन्हा एकदा आग्रही भूमिका घेतली आहे.

लोकपालच्या मुद्यावरून देशभऱ आंदोलन उभारणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे लोकपालवरची चर्चा संसदेत बसून ऐकणार आहेत. 19,20 आणि 21 डिसेंबरला ही चर्चा होण्याची शक्यता असून अण्णा लोकसभेच्या व्हिजिटर्स गॅलरीत बसून ही चर्चा ऐकणार आहेत. सोमवारीच लोकपाल विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता असून त्याच दिवशी ते लोकसभेत मांडलं जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2011 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close