S M L

प्रश्न सुटत असतील तर बेळगाव कर्नाटकमध्ये राहू द्या - राज

19 डिसेंबरगेल्या 55 वर्षापासून सीमा प्रश्नावर नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. हा प्रश्न काही तोडफोड करुन सुटणार नाही. कानडी सरकार तुमच्यावर मराठी म्हणून अन्याय करत आहे की महाराष्ट्रात जायचं म्हणून होतं आहे. जर महाराष्ट्रात जायचे म्हणून विरोध होतं असेल तर एकदा कर्नाटक सरकारला विचार करण्याची संधी द्या कारण महाराष्ट्रात असं काही अबाद ही अबाद असं काही सुंदर चित्र नाही. पण बेळगावमधल्या मराठींचे प्रश्न कर्नाटकात सुटणार असतील तर विरोध कशाला ? जर तिकडेच त्यांच्या भावी पिढ्यांसाठी कर्नाटकमध्ये प्रश्न सुटत असेल तर बेळगाव कर्नाटकमध्ये राहू द्या असा प्रक्टीकल सल्ला राज यांनी एकिकरण समितीला दिला. याप्रश्नी भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासनही राज यांनी दिले. कर्नाटक सरकारने सुडापोटी बेळगाव महापालिका बरखास्त केली आणि राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात, सीमावासियांनी मराठी भाषिकांनी लढा तीव्र केला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली तर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. बेळगाव प्रश्नी असे किती दिवस लढा देत राहणार आहात, तुमच्यावर होणारी सक्ती कशामुळे होती याची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. गेल्या 55 वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे पण आजपर्यंत काही साध्य झालं नाही. सुप्रिम कोर्टात केस सुरु आहे कोर्टाने निकाल दिल्यानंतर बेळगाव महाराष्ट्रात आला तर आनंद आहे. पण बेळगावमधल्या मराठींचे प्रश्न कर्नाटकात सुटणार असतील तर विरोध कशाला ? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. पण कानडी सरकार तुमच्यावर मराठी म्हणून अन्याय करत आहे की महाराष्ट्रात जायचं म्हणून होतं आहे. जर महाराष्ट्रात जायचं म्हणून विरोध होतं असेल तर एकदा कर्नाटक सरकारला विचार करण्याची संधी द्या कारण महाराष्ट्रात असं काही अबादही अबाद असं काही सुंदर चित्र नाही. इकडे लोडशेडिंग, शेतकर्‍यांच्या, पाण्याच्या समस्या आहेच उगाच महाराष्ट्रात येऊन पश्चाताप झाला असं त्यांना वाटू नये म्हणून जर महाराष्ट्रात जाण्यासाठी विरोध असेल तर मी स्वत: तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी येईल असं आश्वासन राज यांनी दिले तसेच भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी यांचीही भेट घेणार आहोत. पण कानडी सरकारने जर नोकरीत, आणि स्थानीक गोष्टीत मराठी माणसांला सामावून घेतले तर हा प्रश्न किती ताणायचा ? यालाही काही मर्यादा आहे. उद्या जर दुसरा एखादा प्रदेश राज्यात सामावून घ्यायाचा असेल तर त्यांना सुखासमाधानाने ठेवण्याचे सत्ताधारी अनुकूल आहे का ? जर तिकडेच त्यांच्या भावी पिढ्यासाठी कर्नाटकमध्ये प्रश्न सुटत असेल तर मग विरोध कशाला ? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. तसेच प्रत्येकांना आपल्या भाषेचा अभिमान असतोच मग कानडी लोकांनी त्यांचा भागात हट्ट धरला त्यात काय चुकलं. आपणही महाराष्ट्रात मराठी भाषा,मराठी पाट्यासाठी आग्रह धरतोच मग या प्रश्नावर भावनिक मुद्दा बनवून काही साध्य होणार नाही आज नेमक काय घडतंय आणि किती वर्षापासून घडतंय याचा वास्तवादी होऊन निर्णय घ्यावा असा सल्लाही राज यांनी दिला. त्याचबरोबर बेळगावच्या मुद्यावर काही राजकीय पक्ष निवडणुकीचा मुद्दा बनवून समोर येता त्यावर आंदोलनही होतात पण हे कशासाठी ? असा टोला राज यांनी शिवसेनेला लगावला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 09:59 AM IST

प्रश्न सुटत असतील तर बेळगाव कर्नाटकमध्ये राहू द्या - राज

19 डिसेंबर

गेल्या 55 वर्षापासून सीमा प्रश्नावर नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. हा प्रश्न काही तोडफोड करुन सुटणार नाही. कानडी सरकार तुमच्यावर मराठी म्हणून अन्याय करत आहे की महाराष्ट्रात जायचं म्हणून होतं आहे. जर महाराष्ट्रात जायचे म्हणून विरोध होतं असेल तर एकदा कर्नाटक सरकारला विचार करण्याची संधी द्या कारण महाराष्ट्रात असं काही अबाद ही अबाद असं काही सुंदर चित्र नाही. पण बेळगावमधल्या मराठींचे प्रश्न कर्नाटकात सुटणार असतील तर विरोध कशाला ? जर तिकडेच त्यांच्या भावी पिढ्यांसाठी कर्नाटकमध्ये प्रश्न सुटत असेल तर बेळगाव कर्नाटकमध्ये राहू द्या असा प्रक्टीकल सल्ला राज यांनी एकिकरण समितीला दिला. याप्रश्नी भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ असे आश्वासनही राज यांनी दिले.

कर्नाटक सरकारने सुडापोटी बेळगाव महापालिका बरखास्त केली आणि राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटले. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात, सीमावासियांनी मराठी भाषिकांनी लढा तीव्र केला आहे. महाराष्ट्र एकिकरण समितीच्या पदाधिकार्‍यांनी काल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली तर आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली या भेटीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. बेळगाव प्रश्नी असे किती दिवस लढा देत राहणार आहात, तुमच्यावर होणारी सक्ती कशामुळे होती याची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. गेल्या 55 वर्षांपासून हा मुद्दा चर्चेत आहे पण आजपर्यंत काही साध्य झालं नाही. सुप्रिम कोर्टात केस सुरु आहे कोर्टाने निकाल दिल्यानंतर बेळगाव महाराष्ट्रात आला तर आनंद आहे. पण बेळगावमधल्या मराठींचे प्रश्न कर्नाटकात सुटणार असतील तर विरोध कशाला ? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला.

पण कानडी सरकार तुमच्यावर मराठी म्हणून अन्याय करत आहे की महाराष्ट्रात जायचं म्हणून होतं आहे. जर महाराष्ट्रात जायचं म्हणून विरोध होतं असेल तर एकदा कर्नाटक सरकारला विचार करण्याची संधी द्या कारण महाराष्ट्रात असं काही अबादही अबाद असं काही सुंदर चित्र नाही. इकडे लोडशेडिंग, शेतकर्‍यांच्या, पाण्याच्या समस्या आहेच उगाच महाराष्ट्रात येऊन पश्चाताप झाला असं त्यांना वाटू नये म्हणून जर महाराष्ट्रात जाण्यासाठी विरोध असेल तर मी स्वत: तेथील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी येईल असं आश्वासन राज यांनी दिले तसेच भाजपचे अध्यक्ष नितिन गडकरी यांचीही भेट घेणार आहोत. पण कानडी सरकारने जर नोकरीत, आणि स्थानीक गोष्टीत मराठी माणसांला सामावून घेतले तर हा प्रश्न किती ताणायचा ? यालाही काही मर्यादा आहे.

उद्या जर दुसरा एखादा प्रदेश राज्यात सामावून घ्यायाचा असेल तर त्यांना सुखासमाधानाने ठेवण्याचे सत्ताधारी अनुकूल आहे का ? जर तिकडेच त्यांच्या भावी पिढ्यासाठी कर्नाटकमध्ये प्रश्न सुटत असेल तर मग विरोध कशाला ? असा प्रश्नही राज यांनी उपस्थित केला. तसेच प्रत्येकांना आपल्या भाषेचा अभिमान असतोच मग कानडी लोकांनी त्यांचा भागात हट्ट धरला त्यात काय चुकलं. आपणही महाराष्ट्रात मराठी भाषा,मराठी पाट्यासाठी आग्रह धरतोच मग या प्रश्नावर भावनिक मुद्दा बनवून काही साध्य होणार नाही आज नेमक काय घडतंय आणि किती वर्षापासून घडतंय याचा वास्तवादी होऊन निर्णय घ्यावा असा सल्लाही राज यांनी दिला. त्याचबरोबर बेळगावच्या मुद्यावर काही राजकीय पक्ष निवडणुकीचा मुद्दा बनवून समोर येता त्यावर आंदोलनही होतात पण हे कशासाठी ? असा टोला राज यांनी शिवसेनेला लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 09:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close