S M L

वीरांना सलाम करण्यासाठी पुणे ते पानिपत बाईक रॅली

19 डिसेंबरयेत्या 14 जानेवारीला पानिपतच्या रणसंग्रामाला 250 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानेच महाराष्ट्रतील शेकडो तरुण गाठणार आहेत थेट पानिपत. 21 दिवस.... 5000 किलोमिटरचा प्रवास... दररोज पार करायचे अंतर जवळपास 200 किमीहुनही जास्त..आणि हा प्रवास पार करायचा आहे बाईकवरुन... संपूर्ण राज्यभरातले जवळपास 250 तरुण या मोहिमेवर निघाले आहेत. पानिपत मोहिमेवर... मराठ्यांच्या इतिहासातलं महत्वाचं पान ठरलेल्या पानिपत.. इथे जाऊन देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या हजारो वीरांना सलाम करायची कल्पना सशक्त भारत या पुण्यातल्या ग्रुपला सुचली..आणि यातुनच आली ज्या मार्गावरुन मराठे गेले त्या मार्गावरुन प्रवास करत पानिपत गाठायची संकल्पना... अर्थात तरुणाईला जवळच्या वाटणार्‍या बाईक्सवरुन हा संपूर्ण प्रवास केला जाणार आहे.3 जानेवारी ते 24 जानेवारीच्या दरम्यान ही मोहीम पार पडणार आहे. पुणे आणि उद्गीर अशा दोन ठिकाणांवरुन या मोहीमेला सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत जवळपास 250 तरुणांनी या मोहीमेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. महाराष्ट्राबाहेरच्या अनेक तरुणांचाही या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळतोय. हा एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची यातल्या प्रत्येकालाच खात्री आहे. 'हम सब एक है' हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून हे तरुण देणार आहेत. इतिहास शोधताना नवी इतिहास घडवणार्‍या या मोहिमेत सहभागी व्हायचं असेल तर लॉग ऑन करा www.panipat250.com या वेबसाईटवर.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 03:12 PM IST

वीरांना सलाम करण्यासाठी पुणे ते पानिपत बाईक रॅली

19 डिसेंबर

येत्या 14 जानेवारीला पानिपतच्या रणसंग्रामाला 250 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्तानेच महाराष्ट्रतील शेकडो तरुण गाठणार आहेत थेट पानिपत. 21 दिवस.... 5000 किलोमिटरचा प्रवास... दररोज पार करायचे अंतर जवळपास 200 किमीहुनही जास्त..आणि हा प्रवास पार करायचा आहे बाईकवरुन... संपूर्ण राज्यभरातले जवळपास 250 तरुण या मोहिमेवर निघाले आहेत. पानिपत मोहिमेवर... मराठ्यांच्या इतिहासातलं महत्वाचं पान ठरलेल्या पानिपत.. इथे जाऊन देशाच्या रक्षणासाठी बलिदान केलेल्या हजारो वीरांना सलाम करायची कल्पना सशक्त भारत या पुण्यातल्या ग्रुपला सुचली..आणि यातुनच आली ज्या मार्गावरुन मराठे गेले त्या मार्गावरुन प्रवास करत पानिपत गाठायची संकल्पना... अर्थात तरुणाईला जवळच्या वाटणार्‍या बाईक्सवरुन हा संपूर्ण प्रवास केला जाणार आहे.

3 जानेवारी ते 24 जानेवारीच्या दरम्यान ही मोहीम पार पडणार आहे. पुणे आणि उद्गीर अशा दोन ठिकाणांवरुन या मोहीमेला सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत जवळपास 250 तरुणांनी या मोहीमेसाठी रजिस्ट्रेशन केलं आहे. महाराष्ट्राबाहेरच्या अनेक तरुणांचाही या मोहिमेला जोरदार प्रतिसाद मिळतोय. हा एक वेगळा अनुभव ठरणार असल्याची यातल्या प्रत्येकालाच खात्री आहे.

'हम सब एक है' हा संदेश या मोहिमेच्या माध्यमातून हे तरुण देणार आहेत. इतिहास शोधताना नवी इतिहास घडवणार्‍या या मोहिमेत सहभागी व्हायचं असेल तर लॉग ऑन करा www.panipat250.com या वेबसाईटवर.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 03:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close