S M L

27 ते 29 डिसेंबर उपोषण - अण्णा हजारे

20 डिसेंबर'सरकार की नियत साफ नही हैं' असा आरोप करत अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. सरकारने सिटिझन चार्टर विधेयक आज संसदेत मांडले. या विधेयकात केलेल्या तरतुदीवरुन काय पाऊलं उचलणार आहे हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे येणारे लोकपाल विधेयक हे कमकुवत असणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येत्या 27,28 आणि 29 डिसेंबरला उपोषण करणार आहोत असं अण्णांनी जाहीर केलं. तसेच 30, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन आणि पाच राज्यात काँग्रेस विरोधात प्रचार करणार आहे असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अण्णांचे उपोषण हे मुंबईत बीकेसी मैदानावर होणार आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. लोकपाल विधेयकासाठी सरकारी हालचालींना वेग आला आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिमंडळात तयार करण्यात आलेला लोकपालच्या मसुद्याला सहमती दिली. तसेच लोकपालसाठी संसदेचा कालावधी 29 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर लोकपालसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यासर्व घडामोडीसोबत आज पंतप्रधान कार्यालयाचे आणि राज्यमंत्री नारायण स्वामी यांनी संसदेत सिटिझन चार्टर विधेयक सादर केले आहे. सरकारच्या एकापाठोपाठ एका घडामोडींवर टीम अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज राळेगणमध्ये अण्णांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. सरकारने जे सिटिझन चार्टर बिल सादर केले आहे त्यात एक जन तक्रार अधिकारी नेमला आहे. जर एखाद्या व्यक्ती तक्रार घेऊन जाणार, त्याच्याकडून 30 दिवसांची मुदत मिळणार जर इथं प्रश्न मिटला नाही तर तो एका प्राधिकृत अधिकार्‍याकडे जाणार परत इथं त्याला 30 दिवसात न्याय देणे आहे. पण इथं जर न्याय नाही मिळाला तर तो राज्य तक्रार अधिकारीकडे जाईल आणि त्यानेही काही निर्णय दिला नाही तर तो केंद्र अधिकार्‍याकडे जाणार. एका रेशन कार्डसाठी इतक्या खेट्या का मारायच्या ? यावरुन सरकारची नियत साफ नाही हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे लोकपाल कसे येणार हे यावरुन स्पष्ट होतं आहे. त्यामुळे 27,28 आणि 29 डिसेंबरला उपोषण करणार आहे आणि 30,31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन करणार आहोत असं अण्णांनी जाहीर केलं. त्याचबरोबर पाच राज्यामध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार आहोत असंही अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अण्णांचे उपोषण हे मुंबईत बीकेसी मैदानावर होणार आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 01:10 PM IST

27 ते 29 डिसेंबर उपोषण - अण्णा हजारे

20 डिसेंबर

'सरकार की नियत साफ नही हैं' असा आरोप करत अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. सरकारने सिटिझन चार्टर विधेयक आज संसदेत मांडले. या विधेयकात केलेल्या तरतुदीवरुन काय पाऊलं उचलणार आहे हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे येणारे लोकपाल विधेयक हे कमकुवत असणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे येत्या 27,28 आणि 29 डिसेंबरला उपोषण करणार आहोत असं अण्णांनी जाहीर केलं. तसेच 30, 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन आणि पाच राज्यात काँग्रेस विरोधात प्रचार करणार आहे असं अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अण्णांचे उपोषण हे मुंबईत बीकेसी मैदानावर होणार आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली. लोकपाल विधेयकासाठी सरकारी हालचालींना वेग आला आहे. आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंत्रिमंडळात तयार करण्यात आलेला लोकपालच्या मसुद्याला सहमती दिली. तसेच लोकपालसाठी संसदेचा कालावधी 29 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर लोकपालसाठी आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. यासर्व घडामोडीसोबत आज पंतप्रधान कार्यालयाचे आणि राज्यमंत्री नारायण स्वामी यांनी संसदेत सिटिझन चार्टर विधेयक सादर केले आहे. सरकारच्या एकापाठोपाठ एका घडामोडींवर टीम अण्णांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आज राळेगणमध्ये अण्णांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली.

सरकारने जे सिटिझन चार्टर बिल सादर केले आहे त्यात एक जन तक्रार अधिकारी नेमला आहे. जर एखाद्या व्यक्ती तक्रार घेऊन जाणार, त्याच्याकडून 30 दिवसांची मुदत मिळणार जर इथं प्रश्न मिटला नाही तर तो एका प्राधिकृत अधिकार्‍याकडे जाणार परत इथं त्याला 30 दिवसात न्याय देणे आहे. पण इथं जर न्याय नाही मिळाला तर तो राज्य तक्रार अधिकारीकडे जाईल आणि त्यानेही काही निर्णय दिला नाही तर तो केंद्र अधिकार्‍याकडे जाणार. एका रेशन कार्डसाठी इतक्या खेट्या का मारायच्या ? यावरुन सरकारची नियत साफ नाही हे स्पष्ट होतं आहे. त्यामुळे लोकपाल कसे येणार हे यावरुन स्पष्ट होतं आहे. त्यामुळे 27,28 आणि 29 डिसेंबरला उपोषण करणार आहे आणि 30,31 डिसेंबर आणि 1 जानेवारीला देशभरात जेलभरो आंदोलन करणार आहोत असं अण्णांनी जाहीर केलं. त्याचबरोबर पाच राज्यामध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार आहोत असंही अण्णांनी स्पष्ट केलं. तसेच अण्णांचे उपोषण हे मुंबईत बीकेसी मैदानावर होणार आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 01:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close