S M L

आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांचा भूखंड घोटाळा उघड

20 डिसेंबरएकीकडे आदर्श घोटाळा गाजत असताना आता मुंबईत आणखी एक भूखंड घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्याला सोसायटीचे सदस्य असलेले आजी माजी आयएएस-आयपीएस अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील अंधेरीतील चारबंगला परिसरातल्या पाटलीपुत्र या वरिष्ठ सनदी अधिकायांच्या सोसायटीला राज्य सरकारने भूखंड दिला होता. पण या भूखंडाच्या 15 टक्के जागेचा वापर बेकायदेशीर रित्या कामधेनू शॉपिंग मॉल उभारण्यात करण्यात आला आहे. यासंदर्भातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तराने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी जसा कामधेनूच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसाच कायद्याप्रमाणे सोसायटीवरदेखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यामुळे सोसायटीचे सदस्य असलेल्या 50 उच्चपदस्थ आय ए एस आयपीएस अधिका-यांमधल्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सोसायटीच्या सदस्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन सरकारची फसवणूक केली आहे, त्यामुळे कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात सनदी अधिकार्‍यांच्या पाटलीपुत्र सोसायटीला परवानगी देण्यात आली. कोण आहेत हे अधिकारी ?पाटलीपुत्र : नवा 'आदर्श' विद्याधर कानडे- माजी प्रधान सचिव, सोसायटीचे प्रमोटरजॉनी जोसेफ- माजी मुख्य सचिवजे.पी.डांगे- माजी मुख्य सचिवव्ही.रंगनाथन - माजी मुख्य सचिवसुभाष लाला - माजी प्रधान सचिवउमेशचंद्र सरंगी - अतिरिक्त मुख्य सचिवराहुल अस्थाना- आयुक्त, MMRDAटी.चंद्रशेखर- माजी आयुक्त, MMRDAमनुकुमार श्रीवास्तव - नगरविकास प्रधान सचिव देबाशिष चक्रवती र्- मुख्य निवडणूक अधिकारीसत्यपाल सिंह - अतिरिक्त महासंचालकमिलिंद म्हैसकर - वैद्यकीय शिक्षण सचिवआर.ए.राजीव - आयुक्त, ठाणे महापालिकाएच.एम.गजभिय - पोलीस अधिकारीसंजय पांड े- वरिष्ठ पोलीस अधिकारीसुनील पोरवाल - प्रधान सचिव

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 06:00 PM IST

आयएएस, आयपीएस अधिकार्‍यांचा भूखंड घोटाळा उघड

20 डिसेंबर

एकीकडे आदर्श घोटाळा गाजत असताना आता मुंबईत आणखी एक भूखंड घोटाळा उघड झाला आहे. या घोटाळ्याला सोसायटीचे सदस्य असलेले आजी माजी आयएएस-आयपीएस अधिकारी जबाबदार आहेत त्यामुळे सोसायटीच्या पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईतील अंधेरीतील चारबंगला परिसरातल्या पाटलीपुत्र या वरिष्ठ सनदी अधिकायांच्या सोसायटीला राज्य सरकारने भूखंड दिला होता. पण या भूखंडाच्या 15 टक्के जागेचा वापर बेकायदेशीर रित्या कामधेनू शॉपिंग मॉल उभारण्यात करण्यात आला आहे.

यासंदर्भातल्या प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलेल्या उत्तराने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी जसा कामधेनूच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसाच कायद्याप्रमाणे सोसायटीवरदेखील गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यामुळे सोसायटीचे सदस्य असलेल्या 50 उच्चपदस्थ आय ए एस आयपीएस अधिका-यांमधल्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सोसायटीच्या सदस्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करुन सरकारची फसवणूक केली आहे, त्यामुळे कारवाईची मागणी विरोधकांनी केली आहे.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात सनदी अधिकार्‍यांच्या पाटलीपुत्र सोसायटीला परवानगी देण्यात आली. कोण आहेत हे अधिकारी ?पाटलीपुत्र : नवा 'आदर्श'

विद्याधर कानडे- माजी प्रधान सचिव, सोसायटीचे प्रमोटरजॉनी जोसेफ- माजी मुख्य सचिवजे.पी.डांगे- माजी मुख्य सचिवव्ही.रंगनाथन - माजी मुख्य सचिवसुभाष लाला - माजी प्रधान सचिवउमेशचंद्र सरंगी - अतिरिक्त मुख्य सचिवराहुल अस्थाना- आयुक्त, MMRDAटी.चंद्रशेखर- माजी आयुक्त, MMRDAमनुकुमार श्रीवास्तव - नगरविकास प्रधान सचिव देबाशिष चक्रवती र्- मुख्य निवडणूक अधिकारीसत्यपाल सिंह - अतिरिक्त महासंचालकमिलिंद म्हैसकर - वैद्यकीय शिक्षण सचिवआर.ए.राजीव - आयुक्त, ठाणे महापालिकाएच.एम.गजभिय - पोलीस अधिकारीसंजय पांड े- वरिष्ठ पोलीस अधिकारीसुनील पोरवाल - प्रधान सचिव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 06:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close