S M L

'इंदू मिलमधील आंदोलकांवर कारवाई न करणे हे गुन्हेगारीला प्रोत्साहन !'

20 डिसेंबरइंदु मिलमध्ये घुसलेल्या आंदोलकांवर कारवाई न करणे म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे ताशेरे हायकोर्टाने राज्य सरकारवर ओढले आहे. मिलमध्ये घुसलेल्या आंदोलकांना हटविले जावे यासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने हायकोर्टात याचिका केली आहे. याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान न्यायमुर्ती डी. के. देशमुख आणि न्यायमुर्ती अनूप मेहता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. सरकारी जागेत घुसणे हा गुन्हा नाही काय असा सवाल करत हायकोर्टाने सरकार गुन्ह्याला प्रोत्साहन देत असल्याचे भाष्यही सुनावणी दरम्यान केले. उद्या आंदोलक मंत्रालयातही घुसतील आणि म्हणतील आम्ही राज्य चालवतो. त्यातील एक स्वता:ला मुख्यमंत्री देखील म्हणेल. अशा आंदोलनाला शासनाची परवानगी मिळणार आहे का असे विचारुन हायकोर्टाने सरकाची खरडपट्टीही काढली. तर 'आम्ही लोकांच्या भावना हायकोर्टासमोर मांडल्या आहेत, पुढील सुनावणीनंतरच काय ते कळेल', असं मत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 10:43 AM IST

'इंदू मिलमधील आंदोलकांवर कारवाई न करणे हे गुन्हेगारीला प्रोत्साहन !'

20 डिसेंबर

इंदु मिलमध्ये घुसलेल्या आंदोलकांवर कारवाई न करणे म्हणजे एक प्रकारे गुन्हेगारीला प्रोत्साहन देण्यासारखे असल्याचे ताशेरे हायकोर्टाने राज्य सरकारवर ओढले आहे. मिलमध्ये घुसलेल्या आंदोलकांना हटविले जावे यासाठी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाने हायकोर्टात याचिका केली आहे. याचिकेवरील सुनावणीच्या दरम्यान न्यायमुर्ती डी. के. देशमुख आणि न्यायमुर्ती अनूप मेहता यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला धारेवर धरले. सरकारी जागेत घुसणे हा गुन्हा नाही काय असा सवाल करत हायकोर्टाने सरकार गुन्ह्याला प्रोत्साहन देत असल्याचे भाष्यही सुनावणी दरम्यान केले. उद्या आंदोलक मंत्रालयातही घुसतील आणि म्हणतील आम्ही राज्य चालवतो. त्यातील एक स्वता:ला मुख्यमंत्री देखील म्हणेल. अशा आंदोलनाला शासनाची परवानगी मिळणार आहे का असे विचारुन हायकोर्टाने सरकाची खरडपट्टीही काढली. तर 'आम्ही लोकांच्या भावना हायकोर्टासमोर मांडल्या आहेत, पुढील सुनावणीनंतरच काय ते कळेल', असं मत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 10:43 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close