S M L

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

21 डिसेंबरघर थकलेले संन्यासी, भय इथले संपत नाही अशा अनेक भावार्थी कविता लिहीणारे प्रसिद्ध कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे यांना साहित्य अकादामीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'वार्‍यानं हलते रान' या लेखसंग्रहाला 2011 साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच त्यांना विदर्भभूषण पुरस्कार मिळाला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.. त्यांच्या वार्‍याने हलते रान... या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पण त्याआधीच वार्‍याने हलते रान...घर थकलेले संन्यासी..भय इथले संपत नाही.., पाऊस कधीचा पडतो...या त्यांच्या कवितांच्या ओळींनी थेट आपल्या हृदयाचा ठाव घेतला. कवितेतूनच बोलणार्‍या ग्रेस यांनी संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या शीर्षकाने स्तंभलेखनही केलं. 14 फेब्रुवारीला अकादमीच्या पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.मी महाकवी दु:खाचा..प्राचीन नदीपरी खोल..दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल..असं म्हणणारे माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते...गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात... चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी ... राजपुत्र आणि डालिर्ंग या त्यांच्या काव्यसंग्रहानंही रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या वार्‍याने हलते रान... या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पण त्याआधीच. वार्‍याने हलते रान...घर थकलेले संन्यासी..भय इथले संपत नाही.., पाऊस कधीचा पडतो...या त्यांच्या कवितांच्या ओळींनी थेट आपल्या हृदयाचा ठाव घेतला. कवितेतूनच बोलणार्‍या ग्रेस यांनी संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या शीर्षकाने स्तंभलेखनही केलं. चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, वार्‍याने हलते रान...आणि कावळे उडाले स्वामी हे त्यांचे ललित लेखसंग्रह...ग्रेस यांची विचार करण्याची शैली अमूर्त आहे..आणि त्याच स्वरूपात ती प्रगट होते...म्हणूनच.. दु:ख भराला आलं की चंद्र माथ्यावर येतो असं जेव्हा ते म्हणतात.. तेव्हा आपणही तो अनुभव घेतो..जसा अनुभव दु:खाचा..तसाच...एकांताचा, सुखाचा आणि प्रेमाचाही..नसतेच कुणीही अपुले प्राणांवर नभ धरणारे..असं जरी हा कवी म्हणत असला तरी ग्रेसच्या अनेक क वितांनी आपल्या प्राणांवर पाखर घातली आहे. शब्द आणि अर्थाच्या या किमयागाराचे आपल्यावर आभाळाएवढे ऋण आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 10:37 AM IST

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

21 डिसेंबर

घर थकलेले संन्यासी, भय इथले संपत नाही अशा अनेक भावार्थी कविता लिहीणारे प्रसिद्ध कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे यांना साहित्य अकादामीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या 'वार्‍यानं हलते रान' या लेखसंग्रहाला 2011 साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकताच त्यांना विदर्भभूषण पुरस्कार मिळाला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.. त्यांच्या वार्‍याने हलते रान... या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पण त्याआधीच वार्‍याने हलते रान...घर थकलेले संन्यासी..भय इथले संपत नाही.., पाऊस कधीचा पडतो...या त्यांच्या कवितांच्या ओळींनी थेट आपल्या हृदयाचा ठाव घेतला. कवितेतूनच बोलणार्‍या ग्रेस यांनी संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या शीर्षकाने स्तंभलेखनही केलं. 14 फेब्रुवारीला अकादमीच्या पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

मी महाकवी दु:खाचा..प्राचीन नदीपरी खोल..दगडाचे माझ्या हाती वेगाने होते फूल..

असं म्हणणारे माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस. ग्रेस यांचं नाव घेतलं की आठवते...गूढरम्य संध्याकाळ आणि त्यांच्या संध्याकाळच्या कविता. त्यामागोमाग येतात... चंद्रमाधवीच्या प्रदेशातल्या आठवणी ... राजपुत्र आणि डालिर्ंग या त्यांच्या काव्यसंग्रहानंही रसिकांना भुरळ घातली. त्यांच्या वार्‍याने हलते रान... या ललित लेखसंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. पण त्याआधीच. वार्‍याने हलते रान...घर थकलेले संन्यासी..भय इथले संपत नाही.., पाऊस कधीचा पडतो...या त्यांच्या कवितांच्या ओळींनी थेट आपल्या हृदयाचा ठाव घेतला. कवितेतूनच बोलणार्‍या ग्रेस यांनी संध्यामग्न पुरुषाची लक्षणे या शीर्षकाने स्तंभलेखनही केलं. चर्चबेल, मितवा, मृगजळाचे बांधकाम, वार्‍याने हलते रान...आणि कावळे उडाले स्वामी हे त्यांचे ललित लेखसंग्रह...

ग्रेस यांची विचार करण्याची शैली अमूर्त आहे..आणि त्याच स्वरूपात ती प्रगट होते...म्हणूनच.. दु:ख भराला आलं की चंद्र माथ्यावर येतो असं जेव्हा ते म्हणतात.. तेव्हा आपणही तो अनुभव घेतो..जसा अनुभव दु:खाचा..तसाच...एकांताचा, सुखाचा आणि प्रेमाचाही..नसतेच कुणीही अपुले प्राणांवर नभ धरणारे..असं जरी हा कवी म्हणत असला तरी ग्रेसच्या अनेक क वितांनी आपल्या प्राणांवर पाखर घातली आहे. शब्द आणि अर्थाच्या या किमयागाराचे आपल्यावर आभाळाएवढे ऋण आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close