S M L

आदर्श प्रकरणी पाटील आयोगाला 6 महिन्याची मुदतवाढ

21 डिसेंबरआदर्श घोटाळ्याची न्यायायलीन चौकशी करणार्‍या जे. ए.पाटील आयोगाला राज्य सरकारने अंतरिम अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. तसेच आयोगाची मुदत 7 जानेवारीला संपत असल्यामुळे आणखी सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.अशी माहिती उच्चपदस्त सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. दरम्यान, आदर्शच्या काही सदस्यांनी इन्कम टॅक्सला दिलेली माहिती आणि सीबीआयकडील तपशील यात तफावत असल्याने या सर्वांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सनदी अधिकारी देवयानी खोब्रेगडे,माजी कलेक्टर आय.एन.कुंदन,निवृत्ती भोसले, माजी कलेक्टर सी.एस.संगीतराव,माजी मुख्य सचिव डी.के.शंकरन यांचा मुलगा संजय शंकरन,माजी खासदार श्रीनिवास पाटील,अजित सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी काळे,माजी सनदी अधिकारी ज.मो.अभ्यंकर,शिवाजीराव देशमुख यांचा समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 03:33 PM IST

आदर्श प्रकरणी पाटील आयोगाला 6 महिन्याची मुदतवाढ

21 डिसेंबर

आदर्श घोटाळ्याची न्यायायलीन चौकशी करणार्‍या जे. ए.पाटील आयोगाला राज्य सरकारने अंतरिम अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. तसेच आयोगाची मुदत 7 जानेवारीला संपत असल्यामुळे आणखी सहा महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.अशी माहिती उच्चपदस्त सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली. दरम्यान, आदर्शच्या काही सदस्यांनी इन्कम टॅक्सला दिलेली माहिती आणि सीबीआयकडील तपशील यात तफावत असल्याने या सर्वांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सनदी अधिकारी देवयानी खोब्रेगडे,माजी कलेक्टर आय.एन.कुंदन,निवृत्ती भोसले, माजी कलेक्टर सी.एस.संगीतराव,माजी मुख्य सचिव डी.के.शंकरन यांचा मुलगा संजय शंकरन,माजी खासदार श्रीनिवास पाटील,अजित सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष शिवाजी काळे,माजी सनदी अधिकारी ज.मो.अभ्यंकर,शिवाजीराव देशमुख यांचा समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close