S M L

'आदर्श' पूर्णपणे बेकायदेशीर : कॅग

23 डिसेंबरबहुचर्चित आदर्श घोटाळ्याचा कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडण्यात आला. राजकारणी आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने मोक्याच्या ठिकाणचा भूखंड लाटून त्यावर नियमबाह्यरित्या इमले रचण्याची ही सुरस कथा आहे अशा शब्दात कॅगने आदर्श घोटाळ्याचे वर्णन आपल्या अहवालात केलेलं आहे. आदर्शची फाईल जिथं म्हणून परवनगीसाठी फिरली तिथं तिथं कायद्याचे उल्लंघन करण्यात आलं असं कॅगने पुराव्यानीशी सिद्ध केलं आहे.सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचे सबंधित सनदी अधिकारी आणि राजकारण्यांशी इतकं संगनमत होतं की सोसायटी रजिस्टर होण्यापूर्वीच आणि भूखंड ताब्यात येण्यापूर्वीच सोसायटीला वाढीव एफएसआय देण्याचा अर्ज सरकार दरबारी पोहचला होता. कारगील युद्धातील हुतात्मे आणि त्यांच्या विधवांच्या नावाचा वापर आदर्शचा भूखंड मिळवण्यासाठी केला. केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यापूर्वीच आदर्शचा भूखंड सीआरझेड 2 मध्ये असल्याचे बनावट पत्र राज्यसरकारच्या नगरविकास खात्याने जारी केले.तसेच आदर्शची उंची आदर्शचा वाढीव एफएसआय आणि लष्कराचा होकार याबाबतच्या परवानग्या पदाधिकार्‍यांनी आधिकार्‍यांशी संगनमत करून मिळवल्या असं स्पष्टपणे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आदर्शची इमारत बेकायदेशीर आहे पण ती जमिनदोस्त न करता केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांसाठी सरकारी निवास म्हणून वापर करावा अशी महत्त्वाची शिफारस कॅगने अहवालात केली आहे. साहजिकच कॅगच्या या अहवालावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 05:56 PM IST

'आदर्श' पूर्णपणे बेकायदेशीर : कॅग

23 डिसेंबर

बहुचर्चित आदर्श घोटाळ्याचा कॅगचा अहवाल आज विधिमंडळात मांडण्यात आला. राजकारणी आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने मोक्याच्या ठिकाणचा भूखंड लाटून त्यावर नियमबाह्यरित्या इमले रचण्याची ही सुरस कथा आहे अशा शब्दात कॅगने आदर्श घोटाळ्याचे वर्णन आपल्या अहवालात केलेलं आहे. आदर्शची फाईल जिथं म्हणून परवनगीसाठी फिरली तिथं तिथं कायद्याचे उल्लंघन करण्यात आलं असं कॅगने पुराव्यानीशी सिद्ध केलं आहे.

सोसायटीच्या पदाधिकार्‍यांचे सबंधित सनदी अधिकारी आणि राजकारण्यांशी इतकं संगनमत होतं की सोसायटी रजिस्टर होण्यापूर्वीच आणि भूखंड ताब्यात येण्यापूर्वीच सोसायटीला वाढीव एफएसआय देण्याचा अर्ज सरकार दरबारी पोहचला होता. कारगील युद्धातील हुतात्मे आणि त्यांच्या विधवांच्या नावाचा वापर आदर्शचा भूखंड मिळवण्यासाठी केला. केंद्रीय पर्यावरण खात्याची परवानगी मिळवण्यापूर्वीच आदर्शचा भूखंड सीआरझेड 2 मध्ये असल्याचे बनावट पत्र राज्यसरकारच्या नगरविकास खात्याने जारी केले.

तसेच आदर्शची उंची आदर्शचा वाढीव एफएसआय आणि लष्कराचा होकार याबाबतच्या परवानग्या पदाधिकार्‍यांनी आधिकार्‍यांशी संगनमत करून मिळवल्या असं स्पष्टपणे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आदर्शची इमारत बेकायदेशीर आहे पण ती जमिनदोस्त न करता केंद्र सरकारच्या अधिकार्‍यांसाठी सरकारी निवास म्हणून वापर करावा अशी महत्त्वाची शिफारस कॅगने अहवालात केली आहे. साहजिकच कॅगच्या या अहवालावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 05:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close