S M L

महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

23 डिसेंबरमुंबईत आज महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कविवर्य मंगेश पाडगावकर तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार डॉ. जी. जी. पारीख यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे. त्याचबरोबर समाजप्रबोधन पुरस्कार पुण्याहून सुनीती सु. र., असंघटित कष्टकरी आणि सामाजिक प्रश्न या क्षेत्रांसाठी औरंगाबादहून सुभाष लोमटे, ठाणे जिल्ह्यातून ब्रायन लोबो यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात आहे. तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या आठ जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे. या वर्षीचा ललित ग्रंथाचा पुरस्कार मंगेश काळे यांना जाहीर झाला आहे. अपारंपारिक ग्रंथ पुरस्कार मंगला आठलेकर, सामाजिक कार्य विशेष पुरस्कार ज्योती म्हापसेकर आणि नीलिमा मिश्रा यांना जाहीर झाला आहे. विशेष ग्रंथ पुरस्कार चंद्रकार वानखेडे आणि अचला जोशी यांना जाहीर झाला आहे. तसेच रा. शं. दातार नाट्य पुरस्कार सुषमा देशपांडे यांना जाहीर झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 05:23 PM IST

महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर

23 डिसेंबर

मुंबईत आज महाराष्ट्र फाऊंडेशनचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदाचा साहित्य जीवनगौरव पुरस्कार कविवर्य मंगेश पाडगावकर तर समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार डॉ. जी. जी. पारीख यांना जाहीर झाला आहे. प्रत्येकी दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरुप आहे.

त्याचबरोबर समाजप्रबोधन पुरस्कार पुण्याहून सुनीती सु. र., असंघटित कष्टकरी आणि सामाजिक प्रश्न या क्षेत्रांसाठी औरंगाबादहून सुभाष लोमटे, ठाणे जिल्ह्यातून ब्रायन लोबो यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. हे पुरस्कार प्रत्येकी पन्नास हजार रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरुपात आहे. तसेच इतर सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणार्‍या आठ जणांना हे पुरस्कार जाहीर झाले आहे.

या वर्षीचा ललित ग्रंथाचा पुरस्कार मंगेश काळे यांना जाहीर झाला आहे. अपारंपारिक ग्रंथ पुरस्कार मंगला आठलेकर, सामाजिक कार्य विशेष पुरस्कार ज्योती म्हापसेकर आणि नीलिमा मिश्रा यांना जाहीर झाला आहे. विशेष ग्रंथ पुरस्कार चंद्रकार वानखेडे आणि अचला जोशी यांना जाहीर झाला आहे. तसेच रा. शं. दातार नाट्य पुरस्कार सुषमा देशपांडे यांना जाहीर झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 05:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close