S M L

अण्णा संघाचे एजंट - बेनी प्रसाद वर्मा

25 डिसेंबरलोकपालसाठी लढा उभारणारे अण्णा हजारे यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अण्णा संघाचे एजंट असल्याचा आरोप काँग्रेस नेते बेनी प्रसाद वर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वर्तमानपत्राने अण्णा हजारे आणि संघाचे नेते नानाजी देशमुख यांचा एक फोटो प्रसिद्ध केला. अण्णांनी नानाजी देशमुख यांच्यासाठी काम केल्याची बातमी या वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. तसेच वर्मा यांनी अण्णा हजारे युद्धादरम्यान सैन्यातून घाबरून पळल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी तिसर्‍या लढ्याचे रणशिंग फुंकले आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अण्णांच्या या हल्ल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेते बेनी प्रसाद शर्मा यांनी अण्णा 1965 च्या भारत-पाक युध्दात मैदान सोडून पळून आले होतो असा दावा केला. तसेच अण्णा राष्ट्रीय सेवा संघ (आरएसएस) चे एजंट आहे, त्यांचा आवाज दिल्लीत घुमतो मात्र ते त्यांच्याच गावात साधी सरपंचाची निवडणूक जिंकू शकत नाही. वर्मा एवढ्यावर थांबले नाहीतर शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केल्याने तोंडाची खावी लागली होती असा टोलाही वर्मा यांनी लगावला. तर काँग्रेसने केलेल्या आरोपांचे भाजपने खंडन केलं आहे. काँग्रेस अण्णांवर चिखलफेक करत असल्याचे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनीही काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं आहे. बेदींनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा नानाजी देशमुख यांच्या सोबतचा एक फोटो ट्विटरवर टाकला आहे. दिग्विजय यांचे संघाशी संबंध आहेत का असा सवाल बेदींनी विचारला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 25, 2011 01:51 PM IST

अण्णा संघाचे एजंट - बेनी प्रसाद वर्मा

25 डिसेंबर

लोकपालसाठी लढा उभारणारे अण्णा हजारे यांच्यावर काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. अण्णा संघाचे एजंट असल्याचा आरोप काँग्रेस नेते बेनी प्रसाद वर्मा यांनी केला आहे. एका हिंदी वर्तमानपत्राने अण्णा हजारे आणि संघाचे नेते नानाजी देशमुख यांचा एक फोटो प्रसिद्ध केला. अण्णांनी नानाजी देशमुख यांच्यासाठी काम केल्याची बातमी या वर्तमानपत्रात देण्यात आली आहे. त्यावरुन पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला आहे. तसेच वर्मा यांनी अण्णा हजारे युद्धादरम्यान सैन्यातून घाबरून पळल्याचा आरोपही केला आहे. अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकासाठी तिसर्‍या लढ्याचे रणशिंग फुंकले आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अण्णांच्या या हल्ल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी तिखट शब्दात टीका केली आहे. काँग्रेसचे केंद्रीय नेते बेनी प्रसाद शर्मा यांनी अण्णा 1965 च्या भारत-पाक युध्दात मैदान सोडून पळून आले होतो असा दावा केला. तसेच अण्णा राष्ट्रीय सेवा संघ (आरएसएस) चे एजंट आहे, त्यांचा आवाज दिल्लीत घुमतो मात्र ते त्यांच्याच गावात साधी सरपंचाची निवडणूक जिंकू शकत नाही. वर्मा एवढ्यावर थांबले नाहीतर शरद पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर भाष्य केल्याने तोंडाची खावी लागली होती असा टोलाही वर्मा यांनी लगावला. तर काँग्रेसने केलेल्या आरोपांचे भाजपने खंडन केलं आहे. काँग्रेस अण्णांवर चिखलफेक करत असल्याचे भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान, अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनीही काँग्रेसला जशास तसं उत्तर दिलं आहे. बेदींनी काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांचा नानाजी देशमुख यांच्या सोबतचा एक फोटो ट्विटरवर टाकला आहे. दिग्विजय यांचे संघाशी संबंध आहेत का असा सवाल बेदींनी विचारला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 25, 2011 01:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close