S M L

सोनियांच्या घरासमोर धरणं धरणार - अण्णा

26 डिसेंबरसक्षम लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चौथ्यांदा उपोषण करत आहे. उद्यापासून तीन दिवस अण्णांचे उपोषण मुंबईत होतं आहे. काहीवेळापूर्वी अण्णा राळेगणसिध्दीतून आळंदीकडे रवाना झाले आहे. आपलं हे आंदोलन कुठल्याही पक्ष आणि व्यक्तींविरोधात नाही असं अण्णांनी राळेगणहून निघताना स्पष्ट केलं आहे. तसेच मुंबईतल्या उपोषणानंतर दिल्लीत जाणार असल्याचही अण्णांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या उपोषणानंतर अण्णा 30 तारखेला सोनिया गांधींच्या घरासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. गेल्या 10 महिन्यात या पलटीखाऊ सरकारला लोकपाल बिल आणता आलं नाही. त्यामुळे आता निकराचा लढा द्यावा लागेल असंही अण्णांनी राळेगण सोडताना सांगितले. तसेच भ्रष्टाचार संपवण्याची सरकारची इच्छा नाही, महागाईमुळे देश पोखरला गेला आहे असं मत अण्णांनी व्यक्त केलं. जनतेला आता नवा बदल हवा आहे यासाठी लोक लोकपालसाठी रस्त्यावर उतरत आहे. या आंदोलनाला तरुणांनी आतापर्यंत मोठ्याप्रमाणात पाठिंबा दिला आजचे तरुणपिढीचं हे देशाचं भविष्य ठरवू शकते असंही अण्णा यावेळी म्हणाले. उद्या मुंबईत आल्यावर जुहू येथील गांधी पुतळ्याला हार घालून अण्णांची रॅली निघणार आहे. आणि हीच रॅली पुढे एमएमआरडीए मैदानावर जाऊन तिथे अण्णा आपल्या उपोषण आणि आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत रामलीला मैदानावरही कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2011 10:48 AM IST

सोनियांच्या घरासमोर धरणं धरणार - अण्णा

26 डिसेंबर

सक्षम लोकपाल विधेयकासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे चौथ्यांदा उपोषण करत आहे. उद्यापासून तीन दिवस अण्णांचे उपोषण मुंबईत होतं आहे. काहीवेळापूर्वी अण्णा राळेगणसिध्दीतून आळंदीकडे रवाना झाले आहे. आपलं हे आंदोलन कुठल्याही पक्ष आणि व्यक्तींविरोधात नाही असं अण्णांनी राळेगणहून निघताना स्पष्ट केलं आहे. तसेच मुंबईतल्या उपोषणानंतर दिल्लीत जाणार असल्याचही अण्णांनी स्पष्ट केलं. मुंबईतल्या उपोषणानंतर अण्णा 30 तारखेला सोनिया गांधींच्या घरासमोर धरणं आंदोलन करणार आहेत. गेल्या 10 महिन्यात या पलटीखाऊ सरकारला लोकपाल बिल आणता आलं नाही. त्यामुळे आता निकराचा लढा द्यावा लागेल असंही अण्णांनी राळेगण सोडताना सांगितले.

तसेच भ्रष्टाचार संपवण्याची सरकारची इच्छा नाही, महागाईमुळे देश पोखरला गेला आहे असं मत अण्णांनी व्यक्त केलं. जनतेला आता नवा बदल हवा आहे यासाठी लोक लोकपालसाठी रस्त्यावर उतरत आहे. या आंदोलनाला तरुणांनी आतापर्यंत मोठ्याप्रमाणात पाठिंबा दिला आजचे तरुणपिढीचं हे देशाचं भविष्य ठरवू शकते असंही अण्णा यावेळी म्हणाले. उद्या मुंबईत आल्यावर जुहू येथील गांधी पुतळ्याला हार घालून अण्णांची रॅली निघणार आहे. आणि हीच रॅली पुढे एमएमआरडीए मैदानावर जाऊन तिथे अण्णा आपल्या उपोषण आणि आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्याचवेळी दिल्लीत रामलीला मैदानावरही कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2011 10:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close