S M L

अण्णांनी उपोषण सोडलं ; सर्व आंदोलनं स्थगित

28 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत 3 दिवसांचे उपोषण करणार होते मात्र तब्येत खालवल्यामुळे अण्णांनी दुसर्‍या दिवशी आपलं उपोषण सोडलं आहे. राळेगण येथील एका शाळकरी मुलीच्या हातून लिंबूपाणी घेऊन अण्णांनी उपोषण सोडलं. तसेच यावेळी दिल्ली आणि मुंबईत काही समर्थक उपोषणाला बसले होते त्यांनी उपोषण सोडावे असं आवाहनही अण्णांनी केलं. दरम्यान, या अगोदर अण्णांनी सरकारवर तोफ डागली. सरकारने लोकसभेत काल मंजूर झालेलं लोकपाल विधेयक कमजोर असल्याचा आरोप अण्णांनी केला. या देशावर हुकूमशहा देशावर सत्ता चालवतायत अशी तोफ त्यांनी डागली. या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 5 राज्यात निवडणुका होतं आहे तिथे जाऊन प्रचार करणार आहे आता यासाठी मतदार जागृती अभियान करणार आहोत त्याचबरोबर जेलभरो आंदोलन, धरणं आंदोलन आता मागे घेत आहोत असंही अण्णांनी जाहीर केलं. लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी 27 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या उपोषणाला बसले तर दुसरीकडे लोकसभेत लोकपालवर चर्चा झाली आणि विधेयक मंजूर झाले. इकडे उपोषणाअगोदर चार दिवसापासून अण्णा आजारी होते. आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी अण्णांची तब्येत फारच खालवली. डॉक्टरांनी,टीमच्या सदस्यांनी अण्णांना विनंती केल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी अण्णांनी लोकपालवर नाराजी दर्शवत सरकारवर हल्लाबोल केला. देशाच्या तिजोरीला चोरांचा धोका नाही तर पहारेदारांचा आहे, त्यामुळे देशाना या गद्दारांचा धोका आहे त्यासाठी यांच्याविरोधात आंदोलन सुरुच ठेवावे लागणार आहे. यासाठी पाच राज्यात निवडणुका होतं आहे तिथे जाऊन लोकांना जागृत करणार आहे. देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजचे आहे. या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद ही देशाची तरुण पिढी आहे. त्यांचा सहभागामुळे आंदोलनाचे यश प्राप्त झाले आहे. दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन झाले होते तेव्हा मला अटक करण्यात आली यामागे पी चिदंबरम यांचा हात होता असा आरोप अण्णांनी केला. उपोषण सोडल्यानंतर अण्णा बांद्र्यातल्या सरकारी विश्रामगृहात मुक्कामासाठी रवाना झाले. अण्णा 2 दिवस मुंबईत राहणार आहेत. आणि त्यानंतर ते राळेगणला रवाना होणार असल्याचं समजतंय. आता येण्यार्‍या पाच राज्यांच्या निवडणुकीत अण्णा हजारे लोकपालला विरोध करणार्‍यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. तसेच अण्णांनी यापुढे होणारी आंदोलनं तूर्तास स्थगित केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2011 01:38 PM IST

अण्णांनी उपोषण सोडलं ; सर्व आंदोलनं स्थगित

28 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत 3 दिवसांचे उपोषण करणार होते मात्र तब्येत खालवल्यामुळे अण्णांनी दुसर्‍या दिवशी आपलं उपोषण सोडलं आहे. राळेगण येथील एका शाळकरी मुलीच्या हातून लिंबूपाणी घेऊन अण्णांनी उपोषण सोडलं. तसेच यावेळी दिल्ली आणि मुंबईत काही समर्थक उपोषणाला बसले होते त्यांनी उपोषण सोडावे असं आवाहनही अण्णांनी केलं.

दरम्यान, या अगोदर अण्णांनी सरकारवर तोफ डागली. सरकारने लोकसभेत काल मंजूर झालेलं लोकपाल विधेयक कमजोर असल्याचा आरोप अण्णांनी केला. या देशावर हुकूमशहा देशावर सत्ता चालवतायत अशी तोफ त्यांनी डागली. या सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 5 राज्यात निवडणुका होतं आहे तिथे जाऊन प्रचार करणार आहे आता यासाठी मतदार जागृती अभियान करणार आहोत त्याचबरोबर जेलभरो आंदोलन, धरणं आंदोलन आता मागे घेत आहोत असंही अण्णांनी जाहीर केलं.

लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी 27 डिसेंबरपासून तीन दिवसांच्या उपोषणाला बसले तर दुसरीकडे लोकसभेत लोकपालवर चर्चा झाली आणि विधेयक मंजूर झाले. इकडे उपोषणाअगोदर चार दिवसापासून अण्णा आजारी होते. आज उपोषणाच्या दुसर्‍या दिवशी अण्णांची तब्येत फारच खालवली. डॉक्टरांनी,टीमच्या सदस्यांनी अण्णांना विनंती केल्यानंतर उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. यावेळी अण्णांनी लोकपालवर नाराजी दर्शवत सरकारवर हल्लाबोल केला. देशाच्या तिजोरीला चोरांचा धोका नाही तर पहारेदारांचा आहे, त्यामुळे देशाना या गद्दारांचा धोका आहे त्यासाठी यांच्याविरोधात आंदोलन सुरुच ठेवावे लागणार आहे.

यासाठी पाच राज्यात निवडणुका होतं आहे तिथे जाऊन लोकांना जागृत करणार आहे. देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजचे आहे. या आंदोलनाची सर्वात मोठी ताकद ही देशाची तरुण पिढी आहे. त्यांचा सहभागामुळे आंदोलनाचे यश प्राप्त झाले आहे. दिल्ली येथे रामलीला मैदानावर आंदोलन झाले होते तेव्हा मला अटक करण्यात आली यामागे पी चिदंबरम यांचा हात होता असा आरोप अण्णांनी केला. उपोषण सोडल्यानंतर अण्णा बांद्र्यातल्या सरकारी विश्रामगृहात मुक्कामासाठी रवाना झाले. अण्णा 2 दिवस मुंबईत राहणार आहेत. आणि त्यानंतर ते राळेगणला रवाना होणार असल्याचं समजतंय. आता येण्यार्‍या पाच राज्यांच्या निवडणुकीत अण्णा हजारे लोकपालला विरोध करणार्‍यांच्या विरोधात प्रचार करणार आहे. तसेच अण्णांनी यापुढे होणारी आंदोलनं तूर्तास स्थगित केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2011 01:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close