S M L

डायबेटीस पेशंटसाठी 'गोड' बातमी

20 नोव्हेंबर, मुंबईउदय जाधवतुम्हाला जर डायबेटीस असेल तर आता चिंता करू नका. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी, डायबेटीस बरं करणारी सर्जरी केली आहे. त्यामुळं सर्वच डायबेटीस पेशंटना चांगला दिलासा मिळाला आहे. या सर्जरीची किंमत आहे सुमारे दोन लाख रुपये. उत्तरप्रदेशातल्या मथुरेत राहणारे व्रजेंद्र सिंग गेल्या दहा वर्षांपासून डायबेटीसच्या आजारानं त्रस्त होते. पण बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एका नव्या सर्जरीनं त्यांना आता पूर्ण बरं केल्याचं ते सांगतात. व्रजेंद्र सिंग यांच्यावर डॉक्टर रमण गोयल यांनी सर्जरी केली आहे. त्यांनी व्रजेंद्र सिंग यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्यासाठी, इन्सुलीनचं प्रमाण नैसर्गिकरित्या वाढवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.व्रजेंद्र सिंग सारखे भारतात तीन कोटी तर जगात सतरा कोटी लोकं डायबेटीसचे पेशंट आहेत. म्हणुन भारताला जगात डायबेटीसची राजधानी म्हणतात. आता या सर्जरीमुळे त्यांना मोठा दिलासा मिळालाय. शरीरात साखरेचं प्रमाण जास्त झालं की डायबेटिस होतो. त्यामुळं अनेक डायबेटीक पेशंट, गोड पदार्थ खाताना हात आखडता घेत. पण या सर्जरीमुळं ते आता, सर्व गोड पदार्थांवर चांगला हात मारू शकतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 06:47 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 06:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close