S M L

राज्यसभा आज ठरवणार 'लोकपाल'चं भवितव्य

29 डिसेंबरमॅरेथॉन चर्चेनंतर लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झालं. आता या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा आणि मतदान होईल. विधेयकात बर्‍याच दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अनेक खासदारांना यावर बोलायचं आहे. त्यामुळे चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे. काल ते शक्य झालं नसतं. त्यामुळे आज चर्चा होईल . पण लोकपालला घटनात्मक दर्जा देऊ पाहणारं विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर काँग्रेस फ्लोअर मॅनेजमेंटबद्दल फारच सावध झालीय. तृणमूल काँग्रेसने लोकायुक्तांच्या निर्मितीबद्दलच्या तरतुदीवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सरकारपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभेत यूपीएकडे बहुमत होतं. पण राज्यसभेत ते नसल्यामुळे सरकारला समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि बहुजन समाज पक्ष अशा पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्यसभेत पक्षीय बलाबल काय आहे ?एकूण संख्या - 243बहुमताचा आकडा - 122विधेयकाला पाठिंबा यूपीए - 97नामनिर्देशित - 8 एकूण - 105 विधेयकाला विरोध भाजप + डावे - 102अनिर्णित - 36 बसपा- 18समाजवादी पक्ष-05राष्ट्रीय जनता दल-04राष्ट्रीय लोकदल-01लोकजनशक्ती पक्ष-01सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट-01अपक्ष आणि इतर-06शक्यता अनिर्णित 36 खासदारांनी बहिष्कार टाकल्यासएकूण संख्या - 209बहुमतासाठी 105 मतांची गरजआज राज्यसभेत काय होणार?1. राज्यसभेत लोकपाल विधेयकावरील चर्चेचा प्रस्ताव मांडला जाणार2. चर्चेसाठी सभागृहाची साध्या बहुमताने मंजुरी मिळवावी लागणार3. जर चर्चेला मंजुरी मिळाली तर चर्चा सुरू होईलमग सरकारतर्फे राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येईल.4. पण सभासदांनी सूचवलेल्या दुरूस्त्यांवर त्या त्या कलमाप्रमाणे मतदान होईल.5. कोणतीही दुरूस्ती ही सभागृहात उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गृहीत धरुन मतदानाच्या माध्यमातून स्वीकारली किंवा फेटाळली जाईल.6. जर विरोधकांनी सूचवलेली एकसुद्धा दुरूस्ती स्वीकारली गेली तर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होऊ शकणार नाही.7. जर विधेयकात दुरूस्त्या केल्या गेल्या तर विधेयक पुन्हा लोकसभेतकडे पाठवलं जाणार8. दुरूस्ती केलेलं विधेयक लोकसभेत मंजूर झालं तर त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकेल. 9. पण लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं नाहीतर संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं जाणार.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2011 09:33 AM IST

राज्यसभा आज ठरवणार 'लोकपाल'चं भवितव्य

29 डिसेंबर

मॅरेथॉन चर्चेनंतर लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झालं. आता या विधेयकावर आज राज्यसभेत चर्चा आणि मतदान होईल. विधेयकात बर्‍याच दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अनेक खासदारांना यावर बोलायचं आहे. त्यामुळे चर्चेसाठी 8 तासांचा वेळ देण्यात आला आहे. काल ते शक्य झालं नसतं. त्यामुळे आज चर्चा होईल . पण लोकपालला घटनात्मक दर्जा देऊ पाहणारं विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्यानंतर काँग्रेस फ्लोअर मॅनेजमेंटबद्दल फारच सावध झालीय. तृणमूल काँग्रेसने लोकायुक्तांच्या निर्मितीबद्दलच्या तरतुदीवर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे सरकारपुढच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभेत यूपीएकडे बहुमत होतं. पण राज्यसभेत ते नसल्यामुळे सरकारला समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल आणि बहुजन समाज पक्ष अशा पक्षांवर अवलंबून राहावे लागणार आहे.

राज्यसभेत पक्षीय बलाबल काय आहे ?एकूण संख्या - 243बहुमताचा आकडा - 122

विधेयकाला पाठिंबा यूपीए - 97नामनिर्देशित - 8 एकूण - 105

विधेयकाला विरोध भाजप डावे - 102अनिर्णित - 36 बसपा- 18समाजवादी पक्ष-05राष्ट्रीय जनता दल-04राष्ट्रीय लोकदल-01लोकजनशक्ती पक्ष-01सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट-01अपक्ष आणि इतर-06

शक्यता अनिर्णित 36 खासदारांनी बहिष्कार टाकल्यासएकूण संख्या - 209बहुमतासाठी 105 मतांची गरज

आज राज्यसभेत काय होणार?1. राज्यसभेत लोकपाल विधेयकावरील चर्चेचा प्रस्ताव मांडला जाणार2. चर्चेसाठी सभागृहाची साध्या बहुमताने मंजुरी मिळवावी लागणार3. जर चर्चेला मंजुरी मिळाली तर चर्चा सुरू होईलमग सरकारतर्फे राज्यसभेत विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात येईल.4. पण सभासदांनी सूचवलेल्या दुरूस्त्यांवर त्या त्या कलमाप्रमाणे मतदान होईल.5. कोणतीही दुरूस्ती ही सभागृहात उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गृहीत धरुन मतदानाच्या माध्यमातून स्वीकारली किंवा फेटाळली जाईल.6. जर विरोधकांनी सूचवलेली एकसुद्धा दुरूस्ती स्वीकारली गेली तर या विधेयकाचं कायद्यात रुपांतर होऊ शकणार नाही.7. जर विधेयकात दुरूस्त्या केल्या गेल्या तर विधेयक पुन्हा लोकसभेतकडे पाठवलं जाणार8. दुरूस्ती केलेलं विधेयक लोकसभेत मंजूर झालं तर त्याचं कायद्यात रुपांतर होऊ शकेल. 9. पण लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं नाहीतर संसदेचं संयुक्त अधिवेशन बोलावलं जाणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2011 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close