S M L

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची कोकणला पसंती

31 जानेवारीसरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्याचं हॉट डेस्टिनेशन म्हणजे गोवा. आणि यंदाही गोव्यात अनेक ठिकाणी न्यू इयर पार्टीज होतायत. देश-परदेशातले पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोव्यातली लहान मोठी सगळी हॉटेल्स बुक झाली आहेत. जवळपास लाखभर पर्यटक गोव्यात दाखल झाल्याचा अंदाज आहे.गोव्यासोबतच गर्दी झालीय ती कोकणात. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीय. गोव्यात वाढलेल्या गर्दीमुळे मालवणचा तारकर्ली बीच फुल झालाय. तसंच दापोलीजवळ हर्णे आणि मुरुडलाही पर्यटक गर्दी करताना दिसतायत. यावर्षी सर्व हॉटेल्स पहाटेपर्यंत खुली असल्यामुळे किना-यावरच्या थर्टीफ़र्स्टसाठी पर्यटकांची गर्दी होणार आहे. सिंधुदुर्गचे किनारे स्वच्छ असल्यामुळे इथे येऊन रहायला आवडतं असं इथं आलेले पर्यटक म्हणतायत. थर्टी फस्ट च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झालीय. अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर, दिवेआगार आणि माथेरान या ठिकाणांना पर्यटकांनी पसंती दिलीय. तर हॉटेल मालक आणि स्थानिकांनी पर्यटकांची खास सोय केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2011 11:11 AM IST

थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांची कोकणला पसंती

31 जानेवारी

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्याचं हॉट डेस्टिनेशन म्हणजे गोवा. आणि यंदाही गोव्यात अनेक ठिकाणी न्यू इयर पार्टीज होतायत. देश-परदेशातले पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे गोव्यातली लहान मोठी सगळी हॉटेल्स बुक झाली आहेत. जवळपास लाखभर पर्यटक गोव्यात दाखल झाल्याचा अंदाज आहे.

गोव्यासोबतच गर्दी झालीय ती कोकणात. थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी कोकणाला पसंती दिलीय. गोव्यात वाढलेल्या गर्दीमुळे मालवणचा तारकर्ली बीच फुल झालाय. तसंच दापोलीजवळ हर्णे आणि मुरुडलाही पर्यटक गर्दी करताना दिसतायत. यावर्षी सर्व हॉटेल्स पहाटेपर्यंत खुली असल्यामुळे किना-यावरच्या थर्टीफ़र्स्टसाठी पर्यटकांची गर्दी होणार आहे. सिंधुदुर्गचे किनारे स्वच्छ असल्यामुळे इथे येऊन रहायला आवडतं असं इथं आलेले पर्यटक म्हणतायत.

थर्टी फस्ट च्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातल्या सर्व पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी झालीय. अलिबाग, मुरूड, हरिहरेश्वर, दिवेआगार आणि माथेरान या ठिकाणांना पर्यटकांनी पसंती दिलीय. तर हॉटेल मालक आणि स्थानिकांनी पर्यटकांची खास सोय केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2011 11:11 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close