S M L

मेट्रोचे शिल्पकार ई.श्रीधरन निवृत्त

01 जानेवारीकोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे शिल्पकार ई.श्रीधरन काल निवृत्त झाले. वक्तशीरपणा आणि साधी राहणी यासाठी प्रसिध्द असणार्‍या ई.श्रीधरन यांच्या कामगिरीचा हा आढावा.. ई.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दिल्लीला एक नवी ओळख दिली. तब्बल 16 वर्षानंतर दिल्ली मेट्राचेे प्रमुख म्हणून ते निवृत्त होत आहे. 190 किलोमीटरचं दिल्ली मेट्रोचं जाळं, जगातलं सर्वात लांबी आणि प्रगतीपथावर असलेलं जाळं म्हणून प्रसिध्द आहे. या मेट्रोमुळेचं 16 लाख दिल्लीकरांच्या वाट्याल्या सुखद प्रवास आला. श्रीधरन, यांनी कायमच लो प्रोफाईल राहण पसंत केलं. ते 15 मिनीटं अगोदर कार्यालयात हजर राहतात आणि कोकण रेल्वेकडून मिळालेल्या घड्याळाचा आजही ते वापर करतात. श्रीधरन म्हणतात, कोकण रेल्वेकडून मिळालेल्या टाईमरचा अजूनही वापर करतो. या घडाळ्यामुळे वेळेचं नियोजन करणं मला जमलंय. सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 1990 ला त्यांनी कोकण रेल्वेच्या सीएमडी (CMD) पदाची जबाबदारी स्विकारली. अवघ्या 7 वषांर्त त्यांनी हा अतिशय अवघड प्रकल्प पूर्णत्वास नेला. भारतातील हा पहिला बीओटी (BOT) आधारीत प्रकल्प होता. या प्रकल्पाअंतर्गत 760 किलोमीटच्या मार्गावर 93 आणि 150 पूल तयार करावे लागले. श्रीधरन यांना 2007 साली इंडियन ऑफ द ईयर या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. साधी राहणी आणि योगामधून श्रीधरन यांना कामाची उर्जा मिळते. श्रीधरन यांनी आता दिल्ली मेट्रोची जबाबदारी, मधू सिंह यांच्याकडे सोपवलीय, दिल्ली कायमची सोडून श्रीधरन आपल्या गावी परतणार आहे. मात्र त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट परिवहन सेवेकरीता कोकण आणि दिल्लीवासींयासोबत संपूर्ण देश कायम ऋणी राहील यात शंका नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2012 03:00 PM IST

मेट्रोचे शिल्पकार ई.श्रीधरन निवृत्त

01 जानेवारी

कोकण रेल्वे आणि दिल्ली मेट्रोचे शिल्पकार ई.श्रीधरन काल निवृत्त झाले. वक्तशीरपणा आणि साधी राहणी यासाठी प्रसिध्द असणार्‍या ई.श्रीधरन यांच्या कामगिरीचा हा आढावा..

ई.श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रोच्या माध्यमातून दिल्लीला एक नवी ओळख दिली. तब्बल 16 वर्षानंतर दिल्ली मेट्राचेे प्रमुख म्हणून ते निवृत्त होत आहे. 190 किलोमीटरचं दिल्ली मेट्रोचं जाळं, जगातलं सर्वात लांबी आणि प्रगतीपथावर असलेलं जाळं म्हणून प्रसिध्द आहे. या मेट्रोमुळेचं 16 लाख दिल्लीकरांच्या वाट्याल्या सुखद प्रवास आला.

श्रीधरन, यांनी कायमच लो प्रोफाईल राहण पसंत केलं. ते 15 मिनीटं अगोदर कार्यालयात हजर राहतात आणि कोकण रेल्वेकडून मिळालेल्या घड्याळाचा आजही ते वापर करतात. श्रीधरन म्हणतात, कोकण रेल्वेकडून मिळालेल्या टाईमरचा अजूनही वापर करतो. या घडाळ्यामुळे वेळेचं नियोजन करणं मला जमलंय.

सरकारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर 1990 ला त्यांनी कोकण रेल्वेच्या सीएमडी (CMD) पदाची जबाबदारी स्विकारली. अवघ्या 7 वषांर्त त्यांनी हा अतिशय अवघड प्रकल्प पूर्णत्वास नेला. भारतातील हा पहिला बीओटी (BOT) आधारीत प्रकल्प होता. या प्रकल्पाअंतर्गत 760 किलोमीटच्या मार्गावर 93 आणि 150 पूल तयार करावे लागले.

श्रीधरन यांना 2007 साली इंडियन ऑफ द ईयर या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं. साधी राहणी आणि योगामधून श्रीधरन यांना कामाची उर्जा मिळते. श्रीधरन यांनी आता दिल्ली मेट्रोची जबाबदारी, मधू सिंह यांच्याकडे सोपवलीय, दिल्ली कायमची सोडून श्रीधरन आपल्या गावी परतणार आहे. मात्र त्यांनी दिलेल्या उत्कृष्ट परिवहन सेवेकरीता कोकण आणि दिल्लीवासींयासोबत संपूर्ण देश कायम ऋणी राहील यात शंका नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2012 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close