S M L

गुजरात हायकोर्टाचे मत मुंबई कोर्टाने ध्यानात घ्यावं - राज

02 जानेवारीगुजरातमध्ये स्थानिक भाषांनाच प्राधान्य दिलं पाहिजे असं मत एका खटल्यात गुजरात हाय कोर्टाने व्यक्त केलं होतं. हायकोर्टाचे हे मत मुंबई हायकोर्टानेही लक्षात घ्यावं असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला दिला. तसेच अजूनही मुंबई हायकोर्टला बॉम्बे हायकोर्ट असे नावं आहे ते का बदलच नाही असा सवालही राज यांनी उपस्थित केला. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते. गुजरातमध्ये नॅशनल हाय वे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एनएचआयए (NHAI)नं हिंदीमध्ये एक अध्यादेश काढला होता. त्याला काही शेतकर्‍यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. गुजरातमध्ये गुजराती भाषेतच अध्यादेश काढला जावा. तीच आमची दररोजच्या व्यवहाराची भाषा आहे असं शेतकर्‍यानं म्हटलं होतं. या प्रकरणी हाय कोर्टाने शेतकर्‍यांचे म्हणणं ग्राह्य धरत हे निरीक्षण नोंदवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 03:26 PM IST

गुजरात हायकोर्टाचे मत मुंबई कोर्टाने ध्यानात घ्यावं - राज

02 जानेवारी

गुजरातमध्ये स्थानिक भाषांनाच प्राधान्य दिलं पाहिजे असं मत एका खटल्यात गुजरात हाय कोर्टाने व्यक्त केलं होतं. हायकोर्टाचे हे मत मुंबई हायकोर्टानेही लक्षात घ्यावं असं मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी प्रत्येक वेळी मराठीच्या मुद्यावर बोलतं आलो पण मला चुकीचं ठरवत माझ्यावर टीका केली गेली आता गुजरात हायकोर्टाने जो निर्णय दिला आहे त्यांच्याकडून मुंबई हायकोर्टाने काहीतरी शिकावे असा सल्ला दिला. तसेच अजूनही मुंबई हायकोर्टला बॉम्बे हायकोर्ट असे नावं आहे ते का बदलच नाही असा सवालही राज यांनी उपस्थित केला. राज ठाकरे औरंगाबादमध्ये बोलत होते.

गुजरातमध्ये नॅशनल हाय वे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच एनएचआयए (NHAI)नं हिंदीमध्ये एक अध्यादेश काढला होता. त्याला काही शेतकर्‍यांनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं. गुजरातमध्ये गुजराती भाषेतच अध्यादेश काढला जावा. तीच आमची दररोजच्या व्यवहाराची भाषा आहे असं शेतकर्‍यानं म्हटलं होतं. या प्रकरणी हाय कोर्टाने शेतकर्‍यांचे म्हणणं ग्राह्य धरत हे निरीक्षण नोंदवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close