S M L

'परदेशातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी न्याय मिळावा'

02 जानेवारीपुण्याचा अनुज बिडवे या विद्यार्थ्याची इंग्लंडमधल्या मँचेस्टरमध्ये हत्या झाली होती. मँचेस्टरच्या पोलीस अधिकार्‍यांनी आज पुण्यात येऊन अनुजच्या आईवडिलांची भेट घेतली. आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अनुजची चुलत बहीण सुरुची वाघहीने पत्रकारांना या भेटीबद्दल सविस्तर माहिती दिली अनुजचे उद्या पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यानंतर अनुजचा मृतदेह भारतीय उच्चायुक्तालच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आम्हाची सरकारला एकचं विनंती आहे की सरकारने आता हस्तक्षेप करून अनुजचा मृतदेह भारतात आणावे अशी विनंती अनुजच्या कुटुंबीयांनी केली. तसेच अनुजच्या मारेकर्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे अनुज सारखे अनेक विद्यार्थी परदेशात आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी न्याय मिळावा अशी आशा अनुजच्या कुटुंबीयांनी केली.अनुज बिडवे हत्याप्रकरणात मँचेस्टरमधून कायरन स्टेपलटन नावाच्या एका 20 वर्षीय तरूणाला अनुज हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनुजच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. अनुजच्या हत्येप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी चार जणांना जामिनावर सोडल्याची माहिती मँचेस्टर पोलिसांनी दिली. उद्या अनुजच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यानंतर अनुजचा मृतदेह भारतीय उच्चायुक्तालच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अनुजचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे आईवडील उद्या मँचेस्टरला रवाना होत आहे. दरम्यान, अनुजचं फेसबुक प्रोफाईल ब्लॉक केलं गेलंय. त्याचं फेसबुक अकाऊंट पुन्हा ऑपरेट करता यावं यासाठी ब्रिटीश पोलिसांनी मदत करण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली. 23 वर्षांच्या अनुजची मँचेस्टरमध्ये 26 डिसेंबर रोजी हत्या झाली होती. त्या रात्री काय घडले ?अनुज बिडवे हा ब्रिटनमधल्या लँकेस्टर विद्यापीठामध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेत होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत तो मँचेस्टरमध्ये गेला होता. तिथे दोन माथेफिरू तरुणांनी क्षुल्लक कारणांवरून अनुजची गोळी झाडून हत्या केली. इंग्लंडमध्ये वर्षद्वेषाच्या आगीत आणखी एकाचा बळी गेला... अनुज बिडवे...पुण्याचा हा विद्यार्थी तीन महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेला होता..ख्रिसमसच्या सुट्टीसाठी तो मित्रांसोबत बाहेर गेला तेव्हा एका माथेफिरु तरुणाने त्याच्यावर गोळी झाडली. त्याच्या हत्येच्या बातमीने त्याच्या आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अनुजची हत्या होऊन आठवडा उलटतोय तरी त्याचं पार्थिव अजून भारतात आलेलं नाही. ते लवकर मिळावं यासाठी अनुजचे कुटुंबीय सरकार दरबारी विनंती करत आहेत.आज मँचेस्टरच्या पोलिस अधिकार्‍यांनी अनुजच्या आईवडीलांची भेट घेऊन.. त्याचं सांत्वन केलं आणि तपासाची माहिती दिली. लूटमार किंवा वर्णभेदामुळे हा खून झाला असावा, असा ब्रिटनच्या पोलिसांचा संशय आहे. या घटनेमुळे परदेशात राहणार्‍या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 05:44 PM IST

'परदेशातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी न्याय मिळावा'

02 जानेवारी

पुण्याचा अनुज बिडवे या विद्यार्थ्याची इंग्लंडमधल्या मँचेस्टरमध्ये हत्या झाली होती. मँचेस्टरच्या पोलीस अधिकार्‍यांनी आज पुण्यात येऊन अनुजच्या आईवडिलांची भेट घेतली. आणि त्यांचं सांत्वन केलं. यावेळी अनुजची चुलत बहीण सुरुची वाघहीने पत्रकारांना या भेटीबद्दल सविस्तर माहिती दिली अनुजचे उद्या पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यानंतर अनुजचा मृतदेह भारतीय उच्चायुक्तालच्या ताब्यात देण्यात येणार आहे. आम्हाची सरकारला एकचं विनंती आहे की सरकारने आता हस्तक्षेप करून अनुजचा मृतदेह भारतात आणावे अशी विनंती अनुजच्या कुटुंबीयांनी केली. तसेच अनुजच्या मारेकर्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे अनुज सारखे अनेक विद्यार्थी परदेशात आहे त्यांच्या सुरक्षितेसाठी न्याय मिळावा अशी आशा अनुजच्या कुटुंबीयांनी केली.

अनुज बिडवे हत्याप्रकरणात मँचेस्टरमधून कायरन स्टेपलटन नावाच्या एका 20 वर्षीय तरूणाला अनुज हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर अनुजच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. अनुजच्या हत्येप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी चार जणांना जामिनावर सोडल्याची माहिती मँचेस्टर पोलिसांनी दिली. उद्या अनुजच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम होणार आहे. त्यानंतर अनुजचा मृतदेह भारतीय उच्चायुक्तालच्या ताब्यात देण्यात येणार आहे. अनुजचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्याचे आईवडील उद्या मँचेस्टरला रवाना होत आहे. दरम्यान, अनुजचं फेसबुक प्रोफाईल ब्लॉक केलं गेलंय. त्याचं फेसबुक अकाऊंट पुन्हा ऑपरेट करता यावं यासाठी ब्रिटीश पोलिसांनी मदत करण्याची विनंती त्याच्या कुटुंबीयांनी केली. 23 वर्षांच्या अनुजची मँचेस्टरमध्ये 26 डिसेंबर रोजी हत्या झाली होती.

त्या रात्री काय घडले ?

अनुज बिडवे हा ब्रिटनमधल्या लँकेस्टर विद्यापीठामध्ये मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेत होता. ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत तो मँचेस्टरमध्ये गेला होता. तिथे दोन माथेफिरू तरुणांनी क्षुल्लक कारणांवरून अनुजची गोळी झाडून हत्या केली. इंग्लंडमध्ये वर्षद्वेषाच्या आगीत आणखी एकाचा बळी गेला... अनुज बिडवे...पुण्याचा हा विद्यार्थी तीन महिन्यांपूर्वी शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेला होता..ख्रिसमसच्या सुट्टीसाठी तो मित्रांसोबत बाहेर गेला तेव्हा एका माथेफिरु तरुणाने त्याच्यावर गोळी झाडली. त्याच्या हत्येच्या बातमीने त्याच्या आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. अनुजची हत्या होऊन आठवडा उलटतोय तरी त्याचं पार्थिव अजून भारतात आलेलं नाही. ते लवकर मिळावं यासाठी अनुजचे कुटुंबीय सरकार दरबारी विनंती करत आहेत.

आज मँचेस्टरच्या पोलिस अधिकार्‍यांनी अनुजच्या आईवडीलांची भेट घेऊन.. त्याचं सांत्वन केलं आणि तपासाची माहिती दिली. लूटमार किंवा वर्णभेदामुळे हा खून झाला असावा, असा ब्रिटनच्या पोलिसांचा संशय आहे. या घटनेमुळे परदेशात राहणार्‍या भारतीयांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close