S M L

लोकपालवरून भाजप-काँग्रेसमध्ये चिखलफेक सुरुच

02 जानेवारीलोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप नव्या वर्षातही सुरूच आहेत. हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर झालं नाही, यासाठी पुन्हा दोन्ही पक्षांनी आज पुन्हा एकमेकांवर खापर फोडलं. भाजप नकारात्मक राजकारण खेळतंय, आणि देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण करतंय असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला. भाजपने साथ दिली असती तर हे विधेयक मंजूर झालं असतं असा दावा त्यांनी केला. तर लोकशाहीचा गळा घोटणारे आरोपीच सरकारवर उलटा आरोप करत असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं. भाजपनंही काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. काँग्रेस भाजपविरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला. 28 तारखेलाच सरकारने राज्यसभेत लोकपाल विधेयकावर चर्चा का घडवून आणली नाही, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी विचारला. दुरुस्त्या सुचवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यासाठी विधेयक लांबणीवर टाकता येत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 06:04 PM IST

लोकपालवरून भाजप-काँग्रेसमध्ये चिखलफेक सुरुच

02 जानेवारी

लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोप नव्या वर्षातही सुरूच आहेत. हिवाळी अधिवेशनात लोकपाल विधेयक मंजूर झालं नाही, यासाठी पुन्हा दोन्ही पक्षांनी आज पुन्हा एकमेकांवर खापर फोडलं. भाजप नकारात्मक राजकारण खेळतंय, आणि देशात अविश्वासाचे वातावरण निर्माण करतंय असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केला. भाजपने साथ दिली असती तर हे विधेयक मंजूर झालं असतं असा दावा त्यांनी केला. तर लोकशाहीचा गळा घोटणारे आरोपीच सरकारवर उलटा आरोप करत असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं. भाजपनंही काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं. काँग्रेस भाजपविरोधात खोटा प्रचार करत असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी केला. 28 तारखेलाच सरकारने राज्यसभेत लोकपाल विधेयकावर चर्चा का घडवून आणली नाही, असा प्रश्न भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी विचारला. दुरुस्त्या सुचवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यासाठी विधेयक लांबणीवर टाकता येत नाही, असं त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 06:04 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close