S M L

'आदर्श'बाबत विलासरावांना अंधारातच ठेवलं - तिवारी

04 जानेवारीआदर्श घोटाळ्या प्रकरणी आयोगासमोर साक्ष देताना निलंबित राज्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांनी खळबळजनक खुलासा केला. कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाच्या रुंदीमध्ये कपात करुन ती जमीन सोसायटीला देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारातच ठेवण्यात आलं होतं, त्यांनी याबाबबत काहीही माहिती नव्हती अशी कबुली तिवारी यांनी दिली. आदर्शच्या गैरव्यवहाराबाबतची सुनावणी आयोगापुढे सुरू आहे. सुरुवातीला पेठे मार्गाची रूंदी 60.97 मीटर होती पण राज्य सरकारने एका आदेशाद्वारे 2002 मध्ये ही रुंदी कमा करून 18.40 केली. ही माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली नाही असं तिवारींनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं का,असाच प्रश्न आता निर्माण होतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 09:37 AM IST

'आदर्श'बाबत विलासरावांना अंधारातच ठेवलं - तिवारी

04 जानेवारी

आदर्श घोटाळ्या प्रकरणी आयोगासमोर साक्ष देताना निलंबित राज्य माहिती आयुक्त रामानंद तिवारी यांनी खळबळजनक खुलासा केला. कॅप्टन प्रकाश पेठे मार्गाच्या रुंदीमध्ये कपात करुन ती जमीन सोसायटीला देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारातच ठेवण्यात आलं होतं, त्यांनी याबाबबत काहीही माहिती नव्हती अशी कबुली तिवारी यांनी दिली. आदर्शच्या गैरव्यवहाराबाबतची सुनावणी आयोगापुढे सुरू आहे. सुरुवातीला पेठे मार्गाची रूंदी 60.97 मीटर होती पण राज्य सरकारने एका आदेशाद्वारे 2002 मध्ये ही रुंदी कमा करून 18.40 केली. ही माहिती आपण मुख्यमंत्र्यांना दिली नाही असं तिवारींनी सांगितले आहे. त्यामुळे यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं का,असाच प्रश्न आता निर्माण होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 09:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close