S M L

काँग्रेसच्या प्रचारसभांना सुरुवात

22 नोव्हेंबर, मुंबईअमेय तिरोडकरराज्यातल्या काँग्रेसच्या प्रचारसभांना सुरूवात झाली आहे. जनजागरण विकास यात्रा या नावाखाली या सभा सुरू होतायत. त्या चाळीस दिवस चालतील. विशेष म्हणजे या यात्रेतून मुख्यमंत्र्यांचा लातूर जिल्हा वगळण्यात आला आहे. राज्य सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि काँग्रेस संघटनेची बांधणी ही उद्दीष्टं या यात्रेतून ठेवण्यात आली आहेत. कॉंग्रेसच्या जनजागरण यात्रेला सुरुवात शिर्डीपासून झालीय. काँग्रेसचा स्थापना दिवस अकरा डिसेंबरला आहे. त्यादिवशी यात्रेचा समारोप होईल. चाळीस दिवस चालणार्‍या या यात्रेत पहिल्या दिवशी एकूण पंधरा ठिकाणी या यात्रेमधल्या सभा घेतल्या जातील. यात बुलढाणा, अहमदनगर, सांगली, कल्याण, नाशिक, नांदेड, अकोला सातारा, अमरावती, पुणे, यवतमाळ आणि सिंधुदूर्ग या भागांमध्ये सभा होणार आहेत. 'जनतेपर्यंत पोहोचायचं, जे काही काम आहे ते लोकांना सांगायंच हे या यात्रेतलं प्रमुख काम आहे. आणि हे संघटनात्मक काम आहे' असं प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितलं.मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर शहरी भागाचं महत्त्व वाठलं आहे. त्यामुळेच कॉंग्रेसने शहरांवर भर दिला आहे. या यात्रेत राज्यभरात एकूण 9,125 सभा होतायंत. त्यामध्ये बावीस महानगरपालिकांध्ये 1100 सभा होतील. तर, नगरपालिकांमध्ये 5550 सभा ठेवण्यात आल्यात. ग्रामीण भागांमध्ये 2475 सभा होतील.राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यामध्ये सभा ठेवलेल्या आहेत. फक्त मुख्यमंत्र्यांच्या लातूर जिल्हा याला अपवाद ठरलाय. या जिल्ह्यात विकास पोहोचलाच नाही की तिथे सभा घेण्यासारखी परिस्थिती नाही याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांत चर्चा सुरू आहे. काँग्रेससाठी अवघड असलेल्या ठाणे जिल्ह्यातील यात्रेची जबाबदारी नारायण राणे यांच्यावर टाकण्यात आलीय. याशिवाय प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या विभागातील यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 06:23 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 06:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close