S M L

आघाडी 7 पालिकांसाठी ; पुणे,सोलापुरात वेगळ्या चुली ?

04 जानेवारीमहापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची चर्चा सुरूच राहणार आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, अकोला, उल्हासनगर, अमरावती, आणि नागपूर या 7 महापालिकांत आघाडीबात सकारात्मक चर्चा झाली आहे. ही चर्चा सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबईतल्या जागावाटपांवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती उद्या किंवा परवा पुन्हा बैठक होणार आहे. तर इतर 6 महापालिकांच्या जागावाटपाबाबत दोन दिवसांत निर्णय घेण्याचं ठरलं आहे. पण, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या महापालिकांमध्ये आघाडी होणार नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आयबीएन-लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं. पिंपरी-चिंचवडमध्ये आघाडी करायची राष्ट्रवादीची इच्छा नाही, तर सोलापूरमध्ये काँग्रेसची इच्छा नाही असंही माणिकराव ठाकरे म्हणाले. तसेच पुण्याबाबतही शक्यता मावळल्याचे संकेत त्यांनी दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 02:32 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 02:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close