S M L

काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 जागांवरुन अडलं आघाडीचं घोडं

05 जानेवारीमुंबई महापालिकेच्या आघाडीबाबतचा काँग्रेस - राष्ट्रवादीचा तिढा अजून कायम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 15 जागांची मागणी केली आहे. पण काँग्रेसमात्र 15 जागा सोडायला तयार नाही. बुधवारी झालेल्या दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीत गेल्या निवडणुकीच्या म्हणजे 2007 च्या पक्षीय बलाबलाचा विचार कऱण्यात आला. 2007 सालच्या निवडणुकीमध्ये 227 जागांपैकी काँग्रेसने 71 जागा जिंकल्या होत्या तर 101 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होत्या. अशाप्रकारे 172 जागांवर काँग्रेसला तडजोड करायची नाही. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा जिंकता आल्या. 22 जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर गेले. अशाप्रकारे 36 जागा राष्ट्रवादीच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला उरलेल्या 31 जागा द्यायच्या कशा यावरून बराच खल झाला. अखेर गेल्या निवडणुकीतल्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या 23 जागांपैकी 12 जागा राष्ट्रवादीला द्यायचं काँग्रेसने मान्य केलं. अशाप्रकारे काँग्रेसने आतापर्यंतच्या चर्चेत 48 जागा राष्ट्रवादीला देण्याचं मान्य केलं आहे. पण उरलेल्या 15 जागा जर राष्ट्रवादीला द्यायच्या असतील तर त्या जागा काँग्रेसच्या क्रमांक 2 च्या जागा असणार आहेत आणि इथेच आघाडीचं घोडं अडलं आहे. काँग्रेस - राष्ट्रवादीची उद्या बैठकजागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची उद्या बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार असल्याने राष्ट्रवादीकडून बोलण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड आणि सोलापूर मध्ये आघाडी होणार नाही तसेच पुण्यामध्ये आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढतींवर लढण्यावर दोन्ही काँग्रेसचं एकमत होऊ शकतं. तसेच अमरावतीमध्ये आघाडी होण्याची शक्यता धुसर झालीय. त्यामुळे उद्याच्या बैठकीत मुंबईसह उर्वरीत सहा महापालिकांच्या आघाडीबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मदन बाफना यांनी दिलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 11:21 AM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत 15 जागांवरुन अडलं आघाडीचं घोडं

05 जानेवारी

मुंबई महापालिकेच्या आघाडीबाबतचा काँग्रेस - राष्ट्रवादीचा तिढा अजून कायम आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसकडे 15 जागांची मागणी केली आहे. पण काँग्रेसमात्र 15 जागा सोडायला तयार नाही. बुधवारी झालेल्या दोन्ही पक्षनेत्यांच्या बैठकीत गेल्या निवडणुकीच्या म्हणजे 2007 च्या पक्षीय बलाबलाचा विचार कऱण्यात आला. 2007 सालच्या निवडणुकीमध्ये 227 जागांपैकी काँग्रेसने 71 जागा जिंकल्या होत्या तर 101 जागांवर काँग्रेसचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होत्या. अशाप्रकारे 172 जागांवर काँग्रेसला तडजोड करायची नाही.

या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 14 जागा जिंकता आल्या. 22 जागांवर त्यांचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर गेले. अशाप्रकारे 36 जागा राष्ट्रवादीच्या हक्काच्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला उरलेल्या 31 जागा द्यायच्या कशा यावरून बराच खल झाला. अखेर गेल्या निवडणुकीतल्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकाच्या 23 जागांपैकी 12 जागा राष्ट्रवादीला द्यायचं काँग्रेसने मान्य केलं. अशाप्रकारे काँग्रेसने आतापर्यंतच्या चर्चेत 48 जागा राष्ट्रवादीला देण्याचं मान्य केलं आहे. पण उरलेल्या 15 जागा जर राष्ट्रवादीला द्यायच्या असतील तर त्या जागा काँग्रेसच्या क्रमांक 2 च्या जागा असणार आहेत आणि इथेच आघाडीचं घोडं अडलं आहे.

काँग्रेस - राष्ट्रवादीची उद्या बैठक

जागावाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची उद्या बैठक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी सकाळी 10 वाजता ही बैठक होणार असून या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार असल्याने राष्ट्रवादीकडून बोलण्याचे सर्वाधिकार प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड आणि सोलापूर मध्ये आघाडी होणार नाही तसेच पुण्यामध्ये आघाडीऐवजी मैत्रीपूर्ण लढतींवर लढण्यावर दोन्ही काँग्रेसचं एकमत होऊ शकतं. तसेच अमरावतीमध्ये आघाडी होण्याची शक्यता धुसर झालीय. त्यामुळे उद्याच्या बैठकीत मुंबईसह उर्वरीत सहा महापालिकांच्या आघाडीबाबत चर्चा होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते मदन बाफना यांनी दिलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 11:21 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close