S M L

उड्डाणपुलाचे भूमिपूजन अजितदादांना भोवणार ?

05 जानेवारीआचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्ढाणपुलाचं भूमिपूजन केलं होतं. या घटनेची राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी अहवाल पुणे महापालिका आयुक्तांकडून मागवला आहे.अजित पवारांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेचे पालिकेतले गटनेते शाम देशपांडे यांनीसुद्धा केला केली तसेच अजिदादांवर कारवाई करावी अशी मागणीही केली. निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा 3 जानेवारीला दुपारी 3.30 वाजता केल्यानंतर आणि त्याचवेळी आचारसंहिता लागू झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली. अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार पुण्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे शिवसेनेचे पालिकेतील गटनेते शाम देशपांडे यांनी नोंदवली आहे. काल संध्याकाळी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पुढाकारानं आयोजित उड्डाणपुलाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. पण या प्रकारानंतरही अनिल भोसले यांनी मात्र आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 11:50 AM IST

उड्डाणपुलाचे भूमिपूजन अजितदादांना भोवणार ?

05 जानेवारी

आचारसंहिता लागू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्ढाणपुलाचं भूमिपूजन केलं होतं. या घटनेची राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे. राज्याच्या निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी अहवाल पुणे महापालिका आयुक्तांकडून मागवला आहे.अजित पवारांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार शिवसेनेचे पालिकेतले गटनेते शाम देशपांडे यांनीसुद्धा केला केली तसेच अजिदादांवर कारवाई करावी अशी मागणीही केली.

निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांची घोषणा 3 जानेवारीला दुपारी 3.30 वाजता केल्यानंतर आणि त्याचवेळी आचारसंहिता लागू झाल्यानंतर संध्याकाळी 7 वाजता पुण्यात उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेनं केली. अजित पवारांविरोधात आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार पुण्याचे महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याकडे शिवसेनेचे पालिकेतील गटनेते शाम देशपांडे यांनी नोंदवली आहे. काल संध्याकाळी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांच्या पुढाकारानं आयोजित उड्डाणपुलाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते पार पडलं. पण या प्रकारानंतरही अनिल भोसले यांनी मात्र आचारसंहिता भंग केला नसल्याचा दावा केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 11:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close