S M L

चीनमध्ये बंदी केलेल्या 2 भारतीय व्यापार्‍यांची सुटका

04 जानेवारीचीनच्या यीवू प्रांतात भारतीय आणि चिनी व्यापार्‍यांमध्ये आर्थिक कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे दोन भारतीय व्यापार्‍यांना चिनी व्यापार्‍यांनी बंदी बनवलं होतं. आणि त्यांचा छळ केला जात होता. अखेर आज बंदी बनवून ठेवलेल्या दोन व्यापार्‍यांची अखेर सुटका झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी ही माहिती दिली.या व्यापार्‍यांना चिनी पोलिसांनी त्या व्यापार्‍यांना संरक्षण दिलं. पण तिथंही चिनी व्यापारी येऊन त्यांना धमकावत होते. त्या दोघांना अन्न, पाणीही दिलं जात नव्हतं. बंदी बनवलेल्या दीपक रहेजा नावाच्या एका व्यापार्‍याने आयबीएन नेटवर्कशी संपर्क साधून ही परिस्थिती सांगितली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही व्यापार्‍यांना शांघायला हलवण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्री कृष्णा यांनी सांगितलं. दरम्यान, याच वादात हस्तक्षेप करणार्‍या भारतीय दूतावासातल्या एका अधिकार्‍याला कोर्टातच अतिशय वाईट वागणूक देण्यात आली होती. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. यीवू प्रांतात भारतीय व्यापार्‍यांनी जाऊ नये असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. तर, चीनमधल्या भारतीयांनी नीट वागावे असं चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे. हा वाद आता शमला असला तरी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. भारतीयांना प्रामाणिकपणे वागायला शिकवा, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत सरकारला सांगितले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 04:52 PM IST

चीनमध्ये बंदी केलेल्या 2 भारतीय व्यापार्‍यांची सुटका

04 जानेवारी

चीनच्या यीवू प्रांतात भारतीय आणि चिनी व्यापार्‍यांमध्ये आर्थिक कारणावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे दोन भारतीय व्यापार्‍यांना चिनी व्यापार्‍यांनी बंदी बनवलं होतं. आणि त्यांचा छळ केला जात होता. अखेर आज बंदी बनवून ठेवलेल्या दोन व्यापार्‍यांची अखेर सुटका झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी ही माहिती दिली.

या व्यापार्‍यांना चिनी पोलिसांनी त्या व्यापार्‍यांना संरक्षण दिलं. पण तिथंही चिनी व्यापारी येऊन त्यांना धमकावत होते. त्या दोघांना अन्न, पाणीही दिलं जात नव्हतं. बंदी बनवलेल्या दीपक रहेजा नावाच्या एका व्यापार्‍याने आयबीएन नेटवर्कशी संपर्क साधून ही परिस्थिती सांगितली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही व्यापार्‍यांना शांघायला हलवण्यात येत असल्याचे परराष्ट्र मंत्री कृष्णा यांनी सांगितलं. दरम्यान, याच वादात हस्तक्षेप करणार्‍या भारतीय दूतावासातल्या एका अधिकार्‍याला कोर्टातच अतिशय वाईट वागणूक देण्यात आली होती. या मुद्द्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. यीवू प्रांतात भारतीय व्यापार्‍यांनी जाऊ नये असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे. तर, चीनमधल्या भारतीयांनी नीट वागावे असं चिनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खडसावले आहे.

हा वाद आता शमला असला तरी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे. भारतीयांना प्रामाणिकपणे वागायला शिकवा, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत सरकारला सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close