S M L

आघाडीचा वाद चिघळला ; बैठक उद्यावर

08 जानेवारीमुंबई महापालिकेबाबतची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची बोलणी लांबणीवर पडली आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करु नये यासाठी गुरुदास कामत यांनी घेतलेल्या भूमिकेला मुंबईतल्या अनेक काँग्रेस आमदारांचं समर्थन मिळतं आहे. त्यामुळे काँग्रेसमधला गृहकलह वाढताना दिसतोय. आणि म्हणूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता गुरुदास कामत यांच्यासह राष्ट्रवादीबरोबरच्या जागावाटपाबर आक्षेप असलेल्या सर्वच मुंबईतल्या आमदारांना चर्चेसाठी बोलावून घेतलं आहे. वर्षा बंगल्यावर होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, गुरुदास कामत आणि त्यांचे समर्थक आमदार, तसेच राणे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी आदी नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसमधला तिढा सुटत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीशी चर्चेची पुढची फेरी करायची नाही असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं समजतंय.दरम्यान,काँग्रेसच्या गोटात या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीने मात्र आपला पवित्रा बदललेला नाही. 65 जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम आहे. आम्हाला आमची ताकद माहित आहे, मुंबईत आमचा एक खासदारही वाढलाय, त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण काय बोलतं याला महत्त्व नाही, असं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे, असं सांगायलाही वर्मा विसरले नाहीत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 02:13 PM IST

आघाडीचा वाद चिघळला ; बैठक उद्यावर

08 जानेवारी

मुंबई महापालिकेबाबतची काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाची बोलणी लांबणीवर पडली आहे. राष्ट्रवादीबरोबर आघाडी करु नये यासाठी गुरुदास कामत यांनी घेतलेल्या भूमिकेला मुंबईतल्या अनेक काँग्रेस आमदारांचं समर्थन मिळतं आहे. त्यामुळे काँग्रेसमधला गृहकलह वाढताना दिसतोय. आणि म्हणूनच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आता गुरुदास कामत यांच्यासह राष्ट्रवादीबरोबरच्या जागावाटपाबर आक्षेप असलेल्या सर्वच मुंबईतल्या आमदारांना चर्चेसाठी बोलावून घेतलं आहे. वर्षा बंगल्यावर होणार्‍या बैठकीत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंह, गुरुदास कामत आणि त्यांचे समर्थक आमदार, तसेच राणे समर्थक आमदार कालिदास कोळंबकर, माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी आदी नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसमधला तिढा सुटत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीशी चर्चेची पुढची फेरी करायची नाही असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचं समजतंय.

दरम्यान,काँग्रेसच्या गोटात या हालचाली सुरू असताना राष्ट्रवादीने मात्र आपला पवित्रा बदललेला नाही. 65 जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम आहे. आम्हाला आमची ताकद माहित आहे, मुंबईत आमचा एक खासदारही वाढलाय, त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण काय बोलतं याला महत्त्व नाही, असं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी म्हटलं आहे. दोन्ही पक्षांमध्ये आघाडीची चर्चा सुरू आहे, असं सांगायलाही वर्मा विसरले नाहीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 02:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close