S M L

कोल्हापुरात टोल विरोधात 9 जानेवारी महामोर्चा

07 जानेवारीकोल्हापुरात 9 रोजी टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील लाखो लोक भाग घेतील असा अंदाज आहे. गेल्या महिनाभर शहरात टोलविरोधी वातावरण तयार झालं आहे. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत शहरात आयआरबी कंपनीनं केलेले रस्ते दर्जाहीन असल्याचा आरोप करत कोल्हापूरकरांनी टोल द्यायला तीव्र विरोध केला आहे. संतापलेल्या नागरिकांनी आतापर्यंत आयआरबीनं उभारलेले चार टोल नाके फोडले आहे. नागरिकांचा संताप पाहून राज्य सरकारने टोलला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पण, कायमस्वरुपी स्थगिती दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका टोलविरोधी कृती समितीने घेतली. शहरातंर्गत टोल ही संकल्पना देशातल्या कोणत्याच शहरात नाही. नसताना आम्ही शहरातंर्गत रस्त्याला टोल का द्यावा असं सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 12:48 PM IST

कोल्हापुरात टोल विरोधात 9 जानेवारी महामोर्चा

07 जानेवारी

कोल्हापुरात 9 रोजी टोलविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात जिल्ह्यातील लाखो लोक भाग घेतील असा अंदाज आहे. गेल्या महिनाभर शहरात टोलविरोधी वातावरण तयार झालं आहे. रस्ते विकास प्रकल्पातंर्गत शहरात आयआरबी कंपनीनं केलेले रस्ते दर्जाहीन असल्याचा आरोप करत कोल्हापूरकरांनी टोल द्यायला तीव्र विरोध केला आहे. संतापलेल्या नागरिकांनी आतापर्यंत आयआरबीनं उभारलेले चार टोल नाके फोडले आहे. नागरिकांचा संताप पाहून राज्य सरकारने टोलला तात्पुरती स्थगिती दिली आहे. पण, कायमस्वरुपी स्थगिती दिली जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका टोलविरोधी कृती समितीने घेतली. शहरातंर्गत टोल ही संकल्पना देशातल्या कोणत्याच शहरात नाही. नसताना आम्ही शहरातंर्गत रस्त्याला टोल का द्यावा असं सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close