S M L

ठाण्यात राष्ट्रवादीला गळती, शिवसेनेत भरती !

09 जानेवारीठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच गळती लागलीय. काल पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत दोन आजी-माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मनमानीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे दशरथ पाटील यांनी म्हटलं आहे. तर तिकडे विधान परिषदेचे आमदार सुभाष भोईर हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोईर हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील, ठाण्याचे नगरसेवक उमेश पाटील आणि ठाण्याच्याच माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी अनेक पदाधिकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे आणि गोपाल लांडगे उपस्थित होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 02:42 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीला गळती, शिवसेनेत भरती !

09 जानेवारी

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच गळती लागलीय. काल पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत दोन आजी-माजी नगरसेवक आणि काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मनमानीला कंटाळून आपण पक्ष सोडत असल्याचे दशरथ पाटील यांनी म्हटलं आहे. तर तिकडे विधान परिषदेचे आमदार सुभाष भोईर हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भोईर हे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी आयबीएन लोकमतला दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दशरथ पाटील, ठाण्याचे नगरसेवक उमेश पाटील आणि ठाण्याच्याच माजी नगरसेविका सुरेखा पाटील यांनी अनेक पदाधिकार्‍यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, राजन विचारे आणि गोपाल लांडगे उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 02:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close