S M L

जारवा आदिवासींवर अत्याचारबाबत केंद्राने मागवला अहवाल

11 जानेवारीद ऑब्जरव्हर या ब्रिटिश दैनिकाने छापलेल्या एका बातमीमुळे सध्या खळबळ माजली आहे. अंदमान बेटावर पर्यटकांसाठी तिथल्या जारवा जमातीच्या महिलांना जबरदस्ती नाचवण्यात येत असल्याचं वृत्त या दैनिकात छापण्यात आलंय. जारवा ही एक संरक्षित आदिवासी जमात आहे. वृत्तपत्राने एक व्हिडिओही जारी केला आहे. आता केंद्र सरकारने याप्रकरणी अहवाल मागवला आहे.अंदमानमध्ये जारवा जमातीच्या संरक्षित क्षेत्रात पर्यटकांची सहल गेली असतानाचा हा व्हिडिओ असल्याचे दैनिकाचं म्हणणं आहे. त्यात एका पोलीस शिपायाला लाच म्हणून 200 पाऊंड दिले जातात आणि तो जारवा जमातीच्या महिलांना नाचण्याचा आदेश देतो असं दाखवण्यात आलं आहे. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. खळबळ माजवण्यासाठी एका एनजीओने काढलेल्या या व्हिडिओचा आधार घेतला जात असल्याचे पोलीस सांगतात. जारवांच्या संरक्षणासाठीचे कायदे कठोर नसतानाच्या काळातला म्हणजे 2001 सालचा हा व्हिडिओ असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. 2002 साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात अंदमान बेटावरच्या जारवांसाठीच्या संरक्षित क्षेत्रात कुणालाही जाण्यास मनाई केली आहे. कोण आहेत जारवा आदिवासी ?- जारवा आदिवासी हे अंदमान बेटांवरचे मूळ रहिवासी - दक्षिण अंदमानमध्ये वास्तव्य- सध्या फक्त 400 जारवा आदिवासी आहेत- 2002 मध्ये ग्रेट अंदमान रोड बंद करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश- हा रस्ता जारवांच्या संरक्षित क्षेत्रातून जात होता- पण सरकारने कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं नाही- आफ्रिकेबाहेर पडणार्‍या पहिल्या आदिमानवाचे जारवा हे वंशज असल्याची शक्यता

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 02:21 PM IST

जारवा आदिवासींवर अत्याचारबाबत केंद्राने मागवला अहवाल

11 जानेवारी

द ऑब्जरव्हर या ब्रिटिश दैनिकाने छापलेल्या एका बातमीमुळे सध्या खळबळ माजली आहे. अंदमान बेटावर पर्यटकांसाठी तिथल्या जारवा जमातीच्या महिलांना जबरदस्ती नाचवण्यात येत असल्याचं वृत्त या दैनिकात छापण्यात आलंय. जारवा ही एक संरक्षित आदिवासी जमात आहे. वृत्तपत्राने एक व्हिडिओही जारी केला आहे. आता केंद्र सरकारने याप्रकरणी अहवाल मागवला आहे.

अंदमानमध्ये जारवा जमातीच्या संरक्षित क्षेत्रात पर्यटकांची सहल गेली असतानाचा हा व्हिडिओ असल्याचे दैनिकाचं म्हणणं आहे. त्यात एका पोलीस शिपायाला लाच म्हणून 200 पाऊंड दिले जातात आणि तो जारवा जमातीच्या महिलांना नाचण्याचा आदेश देतो असं दाखवण्यात आलं आहे. पण ही बातमी पूर्णपणे चुकीची असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. खळबळ माजवण्यासाठी एका एनजीओने काढलेल्या या व्हिडिओचा आधार घेतला जात असल्याचे पोलीस सांगतात. जारवांच्या संरक्षणासाठीचे कायदे कठोर नसतानाच्या काळातला म्हणजे 2001 सालचा हा व्हिडिओ असल्याचे पोलिसांचे म्हणणं आहे. 2002 साली सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालात अंदमान बेटावरच्या जारवांसाठीच्या संरक्षित क्षेत्रात कुणालाही जाण्यास मनाई केली आहे.

कोण आहेत जारवा आदिवासी ?

- जारवा आदिवासी हे अंदमान बेटांवरचे मूळ रहिवासी - दक्षिण अंदमानमध्ये वास्तव्य- सध्या फक्त 400 जारवा आदिवासी आहेत- 2002 मध्ये ग्रेट अंदमान रोड बंद करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश- हा रस्ता जारवांच्या संरक्षित क्षेत्रातून जात होता- पण सरकारने कोर्टाच्या आदेशाचे पालन केलं नाही- आफ्रिकेबाहेर पडणार्‍या पहिल्या आदिमानवाचे जारवा हे वंशज असल्याची शक्यता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close