S M L

पाकमध्ये सरकार- लष्करात पुन्हा संघर्षाची चिन्हं

11 जानेवारीपाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव नईम खलिद लोधी यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष निर्माण झाला आहे. मेमोगेट केसमध्ये लोधी यांनी कोर्टात साक्ष दिली होती. लष्कर आणि आयएसआय यांच्यावर सरकारचे कोणतंही नियंत्रण नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये खळबळ माजली. आणि नईम यांना पदावरून काढण्याच्या मागणीने जोर धरला. पंतप्रधान गिलानी यांनी मेमोगेट प्रकरणात लष्कर आणि आयएसआय यांच्यावर आरोप केला. लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांनी मेमोगेट प्रकरणात बेकायदेशीर भूमिका बजावल्याचा आरोप गिलानी यांनी केला. यामुळे लष्कराचा संताप झाला आणि लष्कराने सरकारवर तोफ डागली. या वादातूनच गिलानी यांनी संरक्षण सचिव नईम खलिद यांची हकालपट्टी केली. या प्रकरणार चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख कयानी यांनी उद्या कमांडर्सची बैठक बोलावलीय. तर, पाकिस्तान पीपल्स पार्टीनं गुरुवारी संसदेचं विशेष संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2012 04:32 PM IST

पाकमध्ये सरकार- लष्करात पुन्हा संघर्षाची चिन्हं

11 जानेवारी

पाकिस्तानात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरतेची भीती निर्माण झाली आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी संरक्षण सचिव नईम खलिद लोधी यांची हकालपट्टी केली आहे. त्यामुळे पाकिस्तानात पुन्हा एकदा सरकार विरुद्ध लष्कर असा संघर्ष निर्माण झाला आहे. मेमोगेट केसमध्ये लोधी यांनी कोर्टात साक्ष दिली होती. लष्कर आणि आयएसआय यांच्यावर सरकारचे कोणतंही नियंत्रण नाही, असं ते म्हणाले होते. त्यामुळे सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीमध्ये खळबळ माजली. आणि नईम यांना पदावरून काढण्याच्या मागणीने जोर धरला. पंतप्रधान गिलानी यांनी मेमोगेट प्रकरणात लष्कर आणि आयएसआय यांच्यावर आरोप केला. लष्करप्रमुख अश्फाक परवेझ कयानी आणि आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांनी मेमोगेट प्रकरणात बेकायदेशीर भूमिका बजावल्याचा आरोप गिलानी यांनी केला. यामुळे लष्कराचा संताप झाला आणि लष्कराने सरकारवर तोफ डागली. या वादातूनच गिलानी यांनी संरक्षण सचिव नईम खलिद यांची हकालपट्टी केली. या प्रकरणार चर्चा करण्यासाठी लष्करप्रमुख कयानी यांनी उद्या कमांडर्सची बैठक बोलावलीय. तर, पाकिस्तान पीपल्स पार्टीनं गुरुवारी संसदेचं विशेष संयुक्त अधिवेशन बोलावले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2012 04:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close