S M L

ओबीसीत मुस्लिमांना आरक्षणावरून काँग्रेसने झटकले हात

13 जानेवारीमुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी केलेल्या घोषणेपासून काँग्रेसने दूर राहणंच पसंत केलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर मुस्लिमांना ओबीसीत साडे चार टक्क्यांच्या जागी नऊ टक्के आरक्षण देऊ असं खुर्शीद यांनी म्हटलं होतं. पण खुर्शीद यांचं हे वैयक्तिक मत आहे, ती पक्षाची भूमिका नाही असं काँग्रेसने स्पष्ट केले. निवडणूक आयोगानंही याची दखल घेत खुर्शीद यांना नोटीस बजावलीय. पण खुर्शीद यांनी मात्र आपल्या वक्तव्याचे समर्थन केलं होतं. आपलं वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासन असल्याचा दावा खुर्शीद यांनी केला होता. दरम्यान, मुस्लिमांना ओबीसी कोट्यामध्ये वेगळा कोटा देण्यावरून भाजपने काँग्रेस, साजवादी पक्ष आणि मायावतींना फटकारले आहे. काँग्रेस मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अरुण जेटलींनी केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 13, 2012 05:12 PM IST

ओबीसीत मुस्लिमांना आरक्षणावरून काँग्रेसने झटकले हात

13 जानेवारी

मुस्लिमांच्या आरक्षणाबद्दल केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी केलेल्या घोषणेपासून काँग्रेसने दूर राहणंच पसंत केलं आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता आली तर मुस्लिमांना ओबीसीत साडे चार टक्क्यांच्या जागी नऊ टक्के आरक्षण देऊ असं खुर्शीद यांनी म्हटलं होतं. पण खुर्शीद यांचं हे वैयक्तिक मत आहे, ती पक्षाची भूमिका नाही असं काँग्रेसने स्पष्ट केले. निवडणूक आयोगानंही याची दखल घेत खुर्शीद यांना नोटीस बजावलीय. पण खुर्शीद यांनी मात्र आपल्या वक्तव्याचे समर्थन केलं होतं. आपलं वक्तव्य म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासन असल्याचा दावा खुर्शीद यांनी केला होता. दरम्यान, मुस्लिमांना ओबीसी कोट्यामध्ये वेगळा कोटा देण्यावरून भाजपने काँग्रेस, साजवादी पक्ष आणि मायावतींना फटकारले आहे. काँग्रेस मुस्लिमांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अरुण जेटलींनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 13, 2012 05:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close