S M L

अमरावतीत बंडखोर नेत्यांची 'आघाडी'

14 जानेवारीमहापालिका निवडणुकांची रणधुमाळी मुंबई पुण्याप्रमाणेच.. विदर्भातही सुरू झाली आहे. मागील दहा वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता असणार्‍या अमरावती महानगरपालिकेचं चित्र यंदा बदलण्याची चिन्ह दिसत आहे आणि याला कारण आहे भाजप आणि काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल दोन दिग्गज नेते जे यावेळी एकत्र लढत आहे.25 वर्ष जुन्या अमरावती महानगरपालिकेत 10 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु यावेळी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली. तर भाजपतून निलंबित करण्यात आलेले आमदार जगदीश गुप्ता यांनी अमरावती जनविकास आघाडी निर्माण केली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फटका बसणार आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रपतींचा मुलगा राजेंद्र शेखावत यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने माजी मंत्री सुनील देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केलं होतं. त्यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली. आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे बंडखोर देशमुख आणि जगदीश गुप्ता एकत्र लढणार आहे. याशिवाय अपक्ष आमदार अनिल बोडे आणि बच्चू कडू यांच्यासोबत आघाडी करण्याचा देशमुख आणि गुप्ता विचार करत आहे. त्यामुळे 3 आमदार आणि एक माजी मंत्री अशी आघाडी तयार झाल्यास अमरावतीत नवं चित्रं निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अमरावतीत घाम फुटला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 14, 2012 12:40 PM IST

अमरावतीत बंडखोर नेत्यांची 'आघाडी'

14 जानेवारी

महापालिका निवडणुकांची रणधुमाळी मुंबई पुण्याप्रमाणेच.. विदर्भातही सुरू झाली आहे. मागील दहा वर्षापासून काँग्रेस - राष्ट्रवादीची सत्ता असणार्‍या अमरावती महानगरपालिकेचं चित्र यंदा बदलण्याची चिन्ह दिसत आहे आणि याला कारण आहे भाजप आणि काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेल दोन दिग्गज नेते जे यावेळी एकत्र लढत आहे.

25 वर्ष जुन्या अमरावती महानगरपालिकेत 10 वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. परंतु यावेळी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले माजी मंत्री सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली. तर भाजपतून निलंबित करण्यात आलेले आमदार जगदीश गुप्ता यांनी अमरावती जनविकास आघाडी निर्माण केली. त्यामुळे दोन्ही पक्षांना फटका बसणार आहे.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रपतींचा मुलगा राजेंद्र शेखावत यांच्या विरोधात बंडखोरी केल्याने माजी मंत्री सुनील देशमुख यांना काँग्रेसने निलंबित केलं होतं. त्यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली.

आता भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे बंडखोर देशमुख आणि जगदीश गुप्ता एकत्र लढणार आहे. याशिवाय अपक्ष आमदार अनिल बोडे आणि बच्चू कडू यांच्यासोबत आघाडी करण्याचा देशमुख आणि गुप्ता विचार करत आहे. त्यामुळे 3 आमदार आणि एक माजी मंत्री अशी आघाडी तयार झाल्यास अमरावतीत नवं चित्रं निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला अमरावतीत घाम फुटला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 14, 2012 12:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close