S M L

अखेर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला मिळाली जागा

16 जानेवारीपुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटानंतर जवळपास दोन वर्षांनी अखेर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला जागा मिळाली आहे आधी जागा आणि त्यानंतर सरकार दरबारी रखडलेली मंजुरी यातच अनेक वर्ष कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन रखडलं होतं. अखेर आज लेन नं 4 मध्ये उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या हस्ते झालं. महापालिका आयुक्त महेश पाठकही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोरवणकरांनी पोलीस स्टेशनसाठी किती खस्ता खाव्या लागल्या, याचा पाढाच वाचत सरकारी संथपणावर बोट ठेवलं. यावेळी महेश पाठक यांनीही सरकारी कामकाजाच्या त्रुटी मान्य केल्या. या पोलीस स्टेशनमुळे इथल्या नागरिकांबरोबरच ओशो आश्रमात मोठ्या प्रमाणावर येणार्‍या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठीही फायदा होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2012 03:19 PM IST

अखेर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला मिळाली जागा

16 जानेवारी

पुण्यातल्या जर्मन बेकरी स्फोटानंतर जवळपास दोन वर्षांनी अखेर कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनला जागा मिळाली आहे आधी जागा आणि त्यानंतर सरकार दरबारी रखडलेली मंजुरी यातच अनेक वर्ष कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन रखडलं होतं. अखेर आज लेन नं 4 मध्ये उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशनचं उद्घाटन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या हस्ते झालं. महापालिका आयुक्त महेश पाठकही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोरवणकरांनी पोलीस स्टेशनसाठी किती खस्ता खाव्या लागल्या, याचा पाढाच वाचत सरकारी संथपणावर बोट ठेवलं. यावेळी महेश पाठक यांनीही सरकारी कामकाजाच्या त्रुटी मान्य केल्या. या पोलीस स्टेशनमुळे इथल्या नागरिकांबरोबरच ओशो आश्रमात मोठ्या प्रमाणावर येणार्‍या परदेशी नागरिकांच्या सुरक्षेसाठीही फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2012 03:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close