S M L

फ्रायडे रिलिज

20 नोव्हेंबर, मुंबई वीकेण्डला एक हिंदी, एक मराठी आणि दोन हॉलिवुडचे सिनेमे रिलीज होत आहेत. ' किस्ना ', ' ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट ' सिनेमांच्या फ्लॉप शोनंतर आता शोमॅन सुभाष घई ' युवराज ' घेऊन आलेयत . सुभाष घईंचा लकी चार्म अनिल कपूर या सिनेमात आहे. या सिनेमात सलमान खान आणि कतरिनाची जोडी आहे, तर त्यांच्याबरोबर झाएद खानही आहे. अनिल कपूरनं सिनेमात ऑटिस्टिक व्यक्तिरेखा साकारलीये. कतरिनाने सिनेमात म्युझिशियनची भूमिका केली आहे. गुलजार आणि ए. आर. रेहमान यांची जादू जाणवायला लागलीय. सिनेमाचं संगीत आधीच हिट झालंय. आता सिनेमा किती हिट होतोय ते पाहायचं.' डेथ रेस ' हा हॉलिवुडपट तुरुंगातल्या कैद्यांच्या रेसवर आधारित आहे. त्या तुरुंगातली वॉर्डन कैद्यांची जीवघेणी शर्यत लावते. त्या शर्यतीत जो जिवंत राहतो, तो जिंकतो. सिनेमाचं दिग्दर्शन केलंय पॉल अँडरसननं. जॅसन स्टॅथम, जॉन अ‍ॅलन यांच्या भूमिका आहेत. ' मिरर्स ' ही हॉरर फिल्म आहे. अ‍ॅलेक्झांडर अजानं त्याचं दिग्दर्शन केलंय.. बरीच भूतं या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.झी टॉकीजचा ' धुडगूस ' हा मराठी सिनेमाही प्रदर्शित होत आहे. सिनेमात निर्मिती सावंत, संजय नार्वेकर असे कलाकार आहेत. सिनेमा ब्लॅक कॉमेडी आहे. स्वार्थासाठी माणूस काय काय करतो, ही सिनेमाची वन लाइन. संजय नार्वेकर यात राजकरणी बनलाय. सिनेमाची कथा साहित्यिक राजन खान यांची आहे. राजेश देशपांडेचं दिग्दर्शन आहे. एकूणच सिनेमाचे बरेच पर्याय आहेत. त्यामुळे या वीकेण्डला सिनेमाचा मोठा प्लॅन करायला काहीच हरकत नाहीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 01:33 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 01:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close