S M L

गुजरातमध्ये बनणार फायनान्स टेक सिटी

20 नोव्हेंबर, अहमदाबादमनीष देसाई उद्योगांना चालना देण्यासाठी गुजरात देशातली सगळ्यात मोठी फायनान्स टेक सिटी बनवणार आहे. यासाठी सत्तर हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून यामुळे जवळपास 10 लाख लोकांना नोकर्‍या मिळतील.गुजरातमध्ये नॅनो आल्यापासून नरेंद्र मोदींनी आपल्या राज्याला उद्योगांची राजधानी बनवण्याची तयारी सुरू केलीय. अहमदाबादजवळ आता देशातली सगळ्यात मोठी फायनान्स टेक सिटी उभी राहणार आहे. 'यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि रियल इस्टेट या दोन्ही क्षेत्रांची प्रगती होईल. हे एक महत्त्वाचं ग्लोबल फायनान्शियल सेंटर असेल आणि इतर कोणत्याही देशातल्या सेंटरच्या तुलनेत उजवं असेल' असं गिफ्टचे सीईओ सुनील बहल यांनी सांगितलं.या फायनान्स सिटीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, रियल इस्टेट, कोर फायनान्स सर्व्हिस, कॅपिटल मार्केट - ट्रेडिंग, आय.टी आणि बीपीओ कंपन्या असतील. सगळ्या गोष्टी वेळेत पूर्ण झाल्या तर दोन हजार पंधरा सालापर्यंत गुजरातमधलं हे मिनी सिंगापूर कार्यान्वित होईल. पण दोन हजार वीस मध्ये भारताची जी गरज असेल त्याच्या केवळ आठ टक्केच ऑफिस स्पेस यामुळे तयार होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 01:43 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close