S M L

भोपाळमधील घातक कचरा मुंबईच्या वाटेवर

18 जानेवारीभोपाळ वायूगळतीतला घातक घनकचरा आता नागपूरनंतर नवी मुंबईवर लादला जाणार आहे असं समजतंय. पूर्ण देशभरामध्येच या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणाच नाही. तरीही तळोजा एमआयडीसीतल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कारखान्यात हा कचरा जाळण्यासाठी आणला जाणार आहे. याआधी नागपूरच्या डीआरडीओतल्या यंत्रणेमध्ये या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा आदेश जबलपूर खंडपीठाने दिला होता. पण नागपूरमध्ये याला तीव्र विरोध झाला. त्यानंतर नागपूर खंडपीठाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालाही नोटीस पाठवली. तरीही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा घनकचरा नवी मुंबईला हलवण्यासाठी परवानगी दिली आहे. याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तीव्र विरोध आहे. याआधी गुजरातमधल्या नागरिकांनीही हा कचरा तिथे नेण्याला विरोध केला होता. भोपाळचा घातक घनकचरा- 3 डिसेंबर 1984 - युनियन कार्बाइडच्या कारखान्यात वायुगळती- वायूगळतीनंतर तयार झाला घनकचरा- या कचर्‍यामध्ये अनेक घातक रसायनांचा समावेश- कचरा जाळल्याने डायऑक्सिन हा विषारी वायू तयार होतो- डायऑक्सिन आरोग्यासाठी घातक- पुढच्या पिढ्यांमध्ये शारीरिक व्यंगाचा धोका- कॅन्सर, मेंदूचे विकार याचीही भीती

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 02:18 PM IST

भोपाळमधील घातक कचरा मुंबईच्या वाटेवर

18 जानेवारी

भोपाळ वायूगळतीतला घातक घनकचरा आता नागपूरनंतर नवी मुंबईवर लादला जाणार आहे असं समजतंय. पूर्ण देशभरामध्येच या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी यंत्रणाच नाही. तरीही तळोजा एमआयडीसीतल्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड या कारखान्यात हा कचरा जाळण्यासाठी आणला जाणार आहे. याआधी नागपूरच्या डीआरडीओतल्या यंत्रणेमध्ये या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा आदेश जबलपूर खंडपीठाने दिला होता. पण नागपूरमध्ये याला तीव्र विरोध झाला. त्यानंतर नागपूर खंडपीठाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयालाही नोटीस पाठवली. तरीही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा घनकचरा नवी मुंबईला हलवण्यासाठी परवानगी दिली आहे. याला राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा तीव्र विरोध आहे. याआधी गुजरातमधल्या नागरिकांनीही हा कचरा तिथे नेण्याला विरोध केला होता.

भोपाळचा घातक घनकचरा

- 3 डिसेंबर 1984 - युनियन कार्बाइडच्या कारखान्यात वायुगळती- वायूगळतीनंतर तयार झाला घनकचरा- या कचर्‍यामध्ये अनेक घातक रसायनांचा समावेश- कचरा जाळल्याने डायऑक्सिन हा विषारी वायू तयार होतो- डायऑक्सिन आरोग्यासाठी घातक- पुढच्या पिढ्यांमध्ये शारीरिक व्यंगाचा धोका- कॅन्सर, मेंदूचे विकार याचीही भीती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close