S M L

टीबीबद्दल गैरसमजामुळे 9 रुग्णांच्या गावात प्रवेशाला विरोध

18 जानेवारीमुंबईमध्ये टोटल ड्रग रेझिझस्टन्सट टीबीचे 9 पेशंट्स आहेत. हे पेशंट्स कोणत्याही औषधोउपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशा रुग्णांना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव इथल्या शशिकला आरोग्यधाममध्ये दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. या पेशंट्सची ऑक्सिजन पातळी वाढवून प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी त्यांना शहरापासून दूर हलवण्याचा सरकारचा विचार आहे. पण हे शशिकला आरोग्यधाम म्हणजे टीबी पेशंट्साठाचे सॅनिटोरियम आहे. पण, शशिकला आरोग्यधाममध्ये उपचारांसाठी येणार्‍या टीबीच्या पेशंट्सना आणि गावकर्‍यांना या टीडीआर टीबीचा संसर्ग लागू शकतो अशी एक भीती आणि गैरसमज गावात पसरला आहे. तसेच या रुग्णालयात कोणत्याही सुविधा नाहीत. किंवा स्वतंत्र व्यवस्था नाहीत. असं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलंय. शशिकला आरोग्यधाम हे नागरी वस्तीपासून जवळच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुंबईतील पेशंट्स उदगावच्या टीबी सॅनिटोरियम मध्ये न्यायचे असतील तर सरकारला आधी गावकर्‍यांचे समुपदेशन करावे लागणार हे निश्चित.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 18, 2012 03:00 PM IST

टीबीबद्दल गैरसमजामुळे 9 रुग्णांच्या गावात प्रवेशाला विरोध

18 जानेवारी

मुंबईमध्ये टोटल ड्रग रेझिझस्टन्सट टीबीचे 9 पेशंट्स आहेत. हे पेशंट्स कोणत्याही औषधोउपचाराला प्रतिसाद देत नाहीत. अशा रुग्णांना कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव इथल्या शशिकला आरोग्यधाममध्ये दाखल करण्यात येण्याची शक्यता आहे. या पेशंट्सची ऑक्सिजन पातळी वाढवून प्रतिकारशक्ती बळकट करण्यासाठी त्यांना शहरापासून दूर हलवण्याचा सरकारचा विचार आहे. पण हे शशिकला आरोग्यधाम म्हणजे टीबी पेशंट्साठाचे सॅनिटोरियम आहे.

पण, शशिकला आरोग्यधाममध्ये उपचारांसाठी येणार्‍या टीबीच्या पेशंट्सना आणि गावकर्‍यांना या टीडीआर टीबीचा संसर्ग लागू शकतो अशी एक भीती आणि गैरसमज गावात पसरला आहे. तसेच या रुग्णालयात कोणत्याही सुविधा नाहीत. किंवा स्वतंत्र व्यवस्था नाहीत. असं वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितलंय. शशिकला आरोग्यधाम हे नागरी वस्तीपासून जवळच्या अंतरावर आहे. त्यामुळे मुंबईतील पेशंट्स उदगावच्या टीबी सॅनिटोरियम मध्ये न्यायचे असतील तर सरकारला आधी गावकर्‍यांचे समुपदेशन करावे लागणार हे निश्चित.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 18, 2012 03:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close