S M L

जहाज अपघातातील 77 भारतीय प्रवाशी मायदेशी परतले

19 जानेवारीइटलीमध्ये एका क्रूझच्या अपघातात अडकलेले प्रवासी मायदेशी परतू लागले आहे. इटलीमध्ये कोस्टा काँकार्डिया क्रूझला अपघात झाला. त्या क्रूझवर 200 भारतीय प्रवासीही होते. सुखरुप बचावलेल्या या भारतीय प्रवाशांपैकी 77 जण आज भारतात परतले. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर झळकणारा आनंद शब्दातीत होता.या भीषण अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना भारत सरकारने एक हजार युरोची मदत दिलीय. तर क्रूझवरच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आठ महिन्यांचा पगार देण्यात आला. या क्रूझवर ठाण्यातला रसेल रिबेलोही कामाला होता. पण त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाही. कोस्टा काँकर्डिया क्रूझवर प्रवासी आणि कर्मचारी मिळून चार हजार दोनशे माणसं होती. यातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलं. पण या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण अजूनही बेपत्ता आहे. पण सुरक्षेच्या कारणांमुळे शोध मोहिम बंद करण्यात आली. अपघातातून बचावलेल्या भारतीय प्रवाशांचा एक गट सुखरुप मायदेशी परतलाय आणि इतर भारतीय प्रवासीही लवकरच परततील.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 19, 2012 05:07 PM IST

जहाज अपघातातील 77 भारतीय प्रवाशी मायदेशी परतले

19 जानेवारी

इटलीमध्ये एका क्रूझच्या अपघातात अडकलेले प्रवासी मायदेशी परतू लागले आहे. इटलीमध्ये कोस्टा काँकार्डिया क्रूझला अपघात झाला. त्या क्रूझवर 200 भारतीय प्रवासीही होते. सुखरुप बचावलेल्या या भारतीय प्रवाशांपैकी 77 जण आज भारतात परतले. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर झळकणारा आनंद शब्दातीत होता.

या भीषण अपघातातून बचावलेल्या प्रवाशांना भारत सरकारने एक हजार युरोची मदत दिलीय. तर क्रूझवरच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना आठ महिन्यांचा पगार देण्यात आला. या क्रूझवर ठाण्यातला रसेल रिबेलोही कामाला होता. पण त्याचा अजूनही पत्ता लागलेला नाही.

कोस्टा काँकर्डिया क्रूझवर प्रवासी आणि कर्मचारी मिळून चार हजार दोनशे माणसं होती. यातल्या अनेकांना वाचवण्यात यश आलं. पण या भीषण अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला. तर 22 जण अजूनही बेपत्ता आहे. पण सुरक्षेच्या कारणांमुळे शोध मोहिम बंद करण्यात आली. अपघातातून बचावलेल्या भारतीय प्रवाशांचा एक गट सुखरुप मायदेशी परतलाय आणि इतर भारतीय प्रवासीही लवकरच परततील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 19, 2012 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close