S M L

अण्णांचं पंतप्रधानांना खरमरीत पत्र

22 जानेवारीजेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सक्षम लोकपाल विधेयकासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहलं. यावेळी मात्र अण्णांनी पंतप्रधानांसहीत राहुल गांधी, नीतिन गडकरी, मायावती आणि मुलायम सिंह यादव या अन्य चार नेत्यांनाही अण्णांनी पत्र लिहून लोकपालबाबत आपली नाराजी कळवली आहे. या पत्रात पंतप्रधानांना थेट प्रश्नच अण्णांनी विचारले. लोकपालमध्ये संसदेच्या भावनांचा समावेश का नाही ?,या विधेयकासाठी देशातील जनता रस्त्यावर उतरली एकमुखाने भ्रष्टाचारविरोधात आवाज पुकारला त्या लोकभावनेची सरकारला जाण नाही का ? तसेच सशक्त लोकपालसाठी पंतप्रधानांनी हिंमत दाखवावी असं आवाहनही अण्णांनी केलं. त्याचबरोबर कनिष्ठ कर्मचारी आणि सिटीझन चॉर्टरचा समावेश का नाही केला. संसदेच्या मताला किमत नाही का ?असे खडे सवाल अण्णांनी पंतप्रधानांना विचारले तर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनाही काही सवाल विचारले. आपले सरकार हे फक्त तुमचंच ऐकते, संसदेचे नाही त्यामुळे सक्षम लोकपालसाठी आपली भूमिका महत्वाची आहे. सरकारी बिल सशक्त आहे असं तुम्हाला वाटतं का ? तसेच सीबीआयवर सरकारचे नियंत्रण का पाहिजे ? सीबीआयला स्वतंत्र कारभार असू द्यावा तसेच सरकारी लोकपालला तपासाचा अधिकार का नाही दिला ? या सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक प्रचारसभेत आपण दिली पाहिजेत अशी मागणीही अण्णांनी केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2012 05:20 PM IST

अण्णांचं पंतप्रधानांना खरमरीत पत्र

22 जानेवारी

जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा सक्षम लोकपाल विधेयकासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहलं. यावेळी मात्र अण्णांनी पंतप्रधानांसहीत राहुल गांधी, नीतिन गडकरी, मायावती आणि मुलायम सिंह यादव या अन्य चार नेत्यांनाही अण्णांनी पत्र लिहून लोकपालबाबत आपली नाराजी कळवली आहे. या पत्रात पंतप्रधानांना थेट प्रश्नच अण्णांनी विचारले. लोकपालमध्ये संसदेच्या भावनांचा समावेश का नाही ?,या विधेयकासाठी देशातील जनता रस्त्यावर उतरली एकमुखाने भ्रष्टाचारविरोधात आवाज पुकारला त्या लोकभावनेची सरकारला जाण नाही का ? तसेच सशक्त लोकपालसाठी पंतप्रधानांनी हिंमत दाखवावी असं आवाहनही अण्णांनी केलं. त्याचबरोबर कनिष्ठ कर्मचारी आणि सिटीझन चॉर्टरचा समावेश का नाही केला. संसदेच्या मताला किमत नाही का ?असे खडे सवाल अण्णांनी पंतप्रधानांना विचारले तर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनाही काही सवाल विचारले. आपले सरकार हे फक्त तुमचंच ऐकते, संसदेचे नाही त्यामुळे सक्षम लोकपालसाठी आपली भूमिका महत्वाची आहे. सरकारी बिल सशक्त आहे असं तुम्हाला वाटतं का ? तसेच सीबीआयवर सरकारचे नियंत्रण का पाहिजे ? सीबीआयला स्वतंत्र कारभार असू द्यावा तसेच सरकारी लोकपालला तपासाचा अधिकार का नाही दिला ? या सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक प्रचारसभेत आपण दिली पाहिजेत अशी मागणीही अण्णांनी केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2012 05:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close