S M L

नाशिकमध्ये युती होण्याची शक्यता मावळली !

23 जानेवारीआधी मुलाखती आणि नंतर अमावस्या अशी कारणं पुढे करत नाशिक शहरातल्या युतीवर कायमचीच अमवस्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये युती होणार की नाही याबाबतची साशंकता होती. दरम्यान, दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व म्हणजे 122 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय सोपवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेचा फक्त देखावा उभा केल्याने युतीच्या शक्यता मावळल्या असल्याचे बोललं जातंय.दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व 122 जागांसाठी मुलाखती पूर्ण करत एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.त्यातचं निर्णय स्थानिक पातळीवर सोपवण्यात आल्यानं युतीची शक्यता धुसरं झाली आहे. पुण्यातही परिस्थिती वेगळी नाही. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा, पुण्यातही अजून कायम आहे. 8 प्रभांगाचे जागावाटप अडलंय. शिवसेना भाजपचे जागावाटप अडल्याने, रिपाइंची मात्र फरफट होतेय. महत्वाचे म्हणजे यातल्या 2 प्रभागांच्या जागावाटपाची चर्चा उध्दव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. एकूण काय तर पुण्यात आणि नाशिकमध्येअजून युतीला मुहूर्त मिळत नाही. ज्या प्रभागावरून जागावाटपाचं घोडं अडलंय ते प्रभाग पुढील प्रमाणेप्रभााग क्र- 27- किष्कींधानगर, 28- शास्त्रीनगर, 57- मित्रमंडळ, 67- शिवदर्शन, 54- धायरी सनसिटी, 34- सवंतराव चव्हाण नाट्यगृह,72- बिबवेवाडी, 58- मामलेदार कचेरी..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2012 10:12 AM IST

नाशिकमध्ये युती होण्याची शक्यता मावळली !

23 जानेवारी

आधी मुलाखती आणि नंतर अमावस्या अशी कारणं पुढे करत नाशिक शहरातल्या युतीवर कायमचीच अमवस्या येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरुवातीपासूनच नाशिकमध्ये युती होणार की नाही याबाबतची साशंकता होती. दरम्यान, दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व म्हणजे 122 जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत. पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत स्थानिक पातळीवर युतीचा निर्णय सोपवण्यात आला होता. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चेचा फक्त देखावा उभा केल्याने युतीच्या शक्यता मावळल्या असल्याचे बोललं जातंय.

दोन्ही पक्षांनी सर्वच्या सर्व 122 जागांसाठी मुलाखती पूर्ण करत एकमेकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.त्यातचं निर्णय स्थानिक पातळीवर सोपवण्यात आल्यानं युतीची शक्यता धुसरं झाली आहे. पुण्यातही परिस्थिती वेगळी नाही. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा, पुण्यातही अजून कायम आहे. 8 प्रभांगाचे जागावाटप अडलंय. शिवसेना भाजपचे जागावाटप अडल्याने, रिपाइंची मात्र फरफट होतेय. महत्वाचे म्हणजे यातल्या 2 प्रभागांच्या जागावाटपाची चर्चा उध्दव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. एकूण काय तर पुण्यात आणि नाशिकमध्येअजून युतीला मुहूर्त मिळत नाही.

ज्या प्रभागावरून जागावाटपाचं घोडं अडलंय ते प्रभाग पुढील प्रमाणेप्रभााग क्र- 27- किष्कींधानगर, 28- शास्त्रीनगर, 57- मित्रमंडळ, 67- शिवदर्शन, 54- धायरी सनसिटी, 34- सवंतराव चव्हाण नाट्यगृह,72- बिबवेवाडी, 58- मामलेदार कचेरी..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2012 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close