S M L

अग्निपथचं 'तेरी मेरी कहानी' गाणं वगळण्याचा कोर्टाचा आदेश

24 जानेवारीकरण जोहर निर्मीत अग्निपथ हा बहुचर्चित चित्रपट वादात सापडला. जानेवारीला प्रदर्शित होणारा अग्निपथ हा चित्रपट, एक गाणं वगळून प्रदर्शित करण्याचे आदेश नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे.'तेरी मेरी कहानी' या शब्दांनी या गाण्याची सुरुवात होत असून आदित्य सालनकर या नागपूरच्या कवीने हा दावा दाखल केला होता. ह्रतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून या गाण्याचा मुखडा चोरल्याचा आरोप कवी आदित्य सालनकर यांनी केला आहे. अग्निपथच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा सालनकर यांचा दावा नागपूर जिल्हा सत्र न्यायायालयाने प्रथमदर्शनी मान्य करुन हे गाणं प्रदर्शित करायला चित्रपट निर्मात्याला बंदी केली आहे. दरम्यान नागपूर कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता अग्निपथ चित्रपट निर्माते उच्चन्यायालयात दाद मागणार असल्याचं समजतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 24, 2012 10:14 AM IST

अग्निपथचं 'तेरी मेरी कहानी' गाणं वगळण्याचा कोर्टाचा आदेश

24 जानेवारी

करण जोहर निर्मीत अग्निपथ हा बहुचर्चित चित्रपट वादात सापडला. जानेवारीला प्रदर्शित होणारा अग्निपथ हा चित्रपट, एक गाणं वगळून प्रदर्शित करण्याचे आदेश नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहे.'तेरी मेरी कहानी' या शब्दांनी या गाण्याची सुरुवात होत असून आदित्य सालनकर या नागपूरच्या कवीने हा दावा दाखल केला होता. ह्रतिक रोशन आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं असून या गाण्याचा मुखडा चोरल्याचा आरोप कवी आदित्य सालनकर यांनी केला आहे. अग्निपथच्या निर्मात्यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा सालनकर यांचा दावा नागपूर जिल्हा सत्र न्यायायालयाने प्रथमदर्शनी मान्य करुन हे गाणं प्रदर्शित करायला चित्रपट निर्मात्याला बंदी केली आहे. दरम्यान नागपूर कोर्टाच्या या निर्णयाविरोधात आता अग्निपथ चित्रपट निर्माते उच्चन्यायालयात दाद मागणार असल्याचं समजतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 24, 2012 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close