S M L

राष्ट्रवादीत प्रवेश करणारा खासदार कोण ?

27 जानेवारीमागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांना आपल्या पत्रकार परिषदेत हजर करुन शरद पवार यांनी सर्वांना जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे शिवसेनेच्या गडावर एकच गोंधळ उडाला होता. आणि यांचे उत्तर खुद्द शिवसेनेच्या नेत्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले होते. आता काकांच्या पावलावर पाऊल ठेवत उद्या पुतणे अजित पवार असाच एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्या सकाळी 10 वाजता एका पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. अशी घोषणा खुद्द प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली. पण हा खासदार कोण आहे ? कोणत्या पक्षाचा आहे ? हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे उद्या सकाळी प्रवेश करणार खासदार कोण आहे यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2012 06:14 PM IST

राष्ट्रवादीत प्रवेश करणारा खासदार कोण ?

27 जानेवारी

मागील आठवड्यात शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांना आपल्या पत्रकार परिषदेत हजर करुन शरद पवार यांनी सर्वांना जोरदार धक्का दिला. या धक्क्यामुळे शिवसेनेच्या गडावर एकच गोंधळ उडाला होता. आणि यांचे उत्तर खुद्द शिवसेनेच्या नेत्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले होते. आता काकांच्या पावलावर पाऊल ठेवत उद्या पुतणे अजित पवार असाच एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्या सकाळी 10 वाजता एका पक्षाचे अध्यक्ष आणि विद्यमान खासदार उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. अशी घोषणा खुद्द प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केली. पण हा खासदार कोण आहे ? कोणत्या पक्षाचा आहे ? हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं आहे. त्यामुळे उद्या सकाळी प्रवेश करणार खासदार कोण आहे यावर आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2012 06:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close