S M L

युपीत भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर राम मंदिराचा मुद्दा

27 जानेवारीउत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढू लागला आहे. भाजपने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. तर काँग्रेसनं व्हिजन डॉक्युमेंट 2020 प्रसिद्ध केला. काँग्रेसचा मुख्य भर रोजगार निर्मितीवर आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या मतदानाला फक्त 12 दिवस उरलेत. त्यामुळे जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजप आणि काँग्रेसनं आज आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले.भाजपचा जाहीरनामा आरक्षण - सत्तेत आलो तर मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षणातला साडे चार टक्क्यांचा सबकोटा नऊ टक्के करु, असं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे. कोट्यांतर्गत कोटाला भाजपचा तीव्र विरोध ओह. पण राम मंदिर उभारण्याचं आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आलं. काँग्रेसचं व्हिजन डॉक्युमेंट रोजगार - काँग्रेसने पुढच्या पाच वर्षात राज्यात 20 लाख रोजगार निर्मितीची हमी दिलीय. तर भाजपने 1 कोटी रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं आहे. कृषी - काँग्रेसने शेतकर्‍यांना 8 तास वीजपुरवठ्याचे आश्वासन दिलं आहे. तर भाजपने 24 तार वीजपुरवठा त्याशिवाय 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलं आहे. अन्नधान्य - रेशनकार्ड असणार्‍या प्रत्येकाला 3 रुपये किलोनं गहू आणि तांदूळ देण्याचं आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. एवढंच नाही तर मुलींना सायकल, गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप्स, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना गाय आणि मोफत उपचार देण्याची हमीसुद्धा भाजपने दिली आहे. अर्थातच काँग्रेसने या जाहीरनाम्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. भाजपच्या 72 पानी जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींवरही टीका करण्यात आली आहे. सत्तेत आलो तर मायावतींनी उभारलेल्या पार्कची पुनर्बांधणी करु आणि वृंदावनमध्ये स्पिरिच्युएल डिझ्नेलँड उभारु, असं आश्वासन देण्यात आलं आहे. नेहमीप्रमाणे दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये लोकप्रिय आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला आहे. सध्या तर या जाहीरनाम्यांना जाहीरनामाऐवजी व्हिजन डॉक्युमेंट म्हटलं जातं. नाव काहीही असलं तर यातली आश्वासनं कुणीच फार गांभिर्यानं घेत नाही, हाच आजवरचा अनुभव आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 27, 2012 02:28 PM IST

युपीत भाजपच्या निवडणूक अजेंड्यावर राम मंदिराचा मुद्दा

27 जानेवारी

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढू लागला आहे. भाजपने आज निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्यांनी पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरला आहे. तर काँग्रेसनं व्हिजन डॉक्युमेंट 2020 प्रसिद्ध केला. काँग्रेसचा मुख्य भर रोजगार निर्मितीवर आहे. उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या मतदानाला फक्त 12 दिवस उरलेत. त्यामुळे जनतेला आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. भाजप आणि काँग्रेसनं आज आपले जाहीरनामे प्रसिद्ध केले.

भाजपचा जाहीरनामा आरक्षण - सत्तेत आलो तर मुस्लिमांसाठी ओबीसी आरक्षणातला साडे चार टक्क्यांचा सबकोटा नऊ टक्के करु, असं आश्वासन काँग्रेसनं दिलं आहे. कोट्यांतर्गत कोटाला भाजपचा तीव्र विरोध ओह. पण राम मंदिर उभारण्याचं आश्वासन पुन्हा एकदा देण्यात आलं. काँग्रेसचं व्हिजन डॉक्युमेंट रोजगार - काँग्रेसने पुढच्या पाच वर्षात राज्यात 20 लाख रोजगार निर्मितीची हमी दिलीय. तर भाजपने 1 कोटी रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं आहे. कृषी - काँग्रेसने शेतकर्‍यांना 8 तास वीजपुरवठ्याचे आश्वासन दिलं आहे. तर भाजपने 24 तार वीजपुरवठा त्याशिवाय 1 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिलं आहे.

अन्नधान्य - रेशनकार्ड असणार्‍या प्रत्येकाला 3 रुपये किलोनं गहू आणि तांदूळ देण्याचं आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. एवढंच नाही तर मुलींना सायकल, गरीब विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप्स, दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना गाय आणि मोफत उपचार देण्याची हमीसुद्धा भाजपने दिली आहे. अर्थातच काँग्रेसने या जाहीरनाम्यावर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे.

भाजपच्या 72 पानी जाहीरनाम्यात उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींवरही टीका करण्यात आली आहे. सत्तेत आलो तर मायावतींनी उभारलेल्या पार्कची पुनर्बांधणी करु आणि वृंदावनमध्ये स्पिरिच्युएल डिझ्नेलँड उभारु, असं आश्वासन देण्यात आलं आहे.

नेहमीप्रमाणे दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांमध्ये लोकप्रिय आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला आहे. सध्या तर या जाहीरनाम्यांना जाहीरनामाऐवजी व्हिजन डॉक्युमेंट म्हटलं जातं. नाव काहीही असलं तर यातली आश्वासनं कुणीच फार गांभिर्यानं घेत नाही, हाच आजवरचा अनुभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 27, 2012 02:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close