S M L

काँग्रेसचे माजी खासदार शिवाजी मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

28 जानेवारीउद्या एका पक्षाचा अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे असा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केला. मोठा राजकीय भूकंप घडणार अशी शक्यता असताना मात्र राष्ट्रवादीच्या गळाला एक माजी खासदार लागला. आज सकाळी शिवसेनेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आधी शिवसेनेत असलेल्या माने यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर मात्र ते काँग्रेसमध्ये नाराज होते. हीच नाराजी ओळखून जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवाजी माने यांना पक्षात घेण्याचं ठरवलं आहे.शिवाजी मानेंची राष्ट्रवादीत प्रवेशावर प्रतिक्रिया

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 28, 2012 12:05 PM IST

काँग्रेसचे माजी खासदार शिवाजी मानेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

28 जानेवारी

उद्या एका पक्षाचा अध्यक्ष आणि विद्यमान खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे असा गौप्यस्फोट प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी केला. मोठा राजकीय भूकंप घडणार अशी शक्यता असताना मात्र राष्ट्रवादीच्या गळाला एक माजी खासदार लागला. आज सकाळी शिवसेनेचे माजी खासदार आणि काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष शिवाजी माने यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आधी शिवसेनेत असलेल्या माने यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पण त्यानंतर मात्र ते काँग्रेसमध्ये नाराज होते. हीच नाराजी ओळखून जिल्हापरिषद निवडणुकीच्या प्रार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने शिवाजी माने यांना पक्षात घेण्याचं ठरवलं आहे.

शिवाजी मानेंची राष्ट्रवादीत प्रवेशावर प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 28, 2012 12:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close