S M L

सोलापुरात रिपाइं स्वबळावर लढणार

29 जानेवारीसोलापूर महापालिकेच्या निवडणुका आरपीआयने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शिवसेना भाजपाकडून महायुतीच्या संदर्भात विश्वासात घेतलं जात नसल्याने आरपीआयने स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे आरपीआयचे नेते सांगताहेत. आरपीआयला कमी लेखणार्‍या युतीला निवडणुकीच पराभूत करण्याचा इशाराही सोलापुरातील आरपीआयच्या नेत्यांनी दिला. त्याचबरोबर शनिवारी आरपीआयच्या 14 उमदेवरांनी निवडणुकीसाठी अर्जही भरले आहेत. आणि सोमवारी आणखी 11 जागासाठी उमदेवारी अर्ज भरणार असल्याचंही प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदेंनी सांगितलं. तर या महायुतीसंदर्भातील निर्णय वरीष्ठ नेतेच घेतील असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सांगत आहेत. सोलापुरातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यात भाजप 59 तर शिवसेना 43 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यावरून स्पष्ट होतंय की महायुतीत आरपीआयला चर्चेचं साध निमंत्रणही देण्यात आलं नाही त्यामुळे आपली फरपट रोकण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 29, 2012 12:45 PM IST

सोलापुरात रिपाइं स्वबळावर लढणार

29 जानेवारी

सोलापूर महापालिकेच्या निवडणुका आरपीआयने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण शिवसेना भाजपाकडून महायुतीच्या संदर्भात विश्वासात घेतलं जात नसल्याने आरपीआयने स्वबळावर निवडणुका लढवणार असल्याचे आरपीआयचे नेते सांगताहेत. आरपीआयला कमी लेखणार्‍या युतीला निवडणुकीच पराभूत करण्याचा इशाराही सोलापुरातील आरपीआयच्या नेत्यांनी दिला. त्याचबरोबर शनिवारी आरपीआयच्या 14 उमदेवरांनी निवडणुकीसाठी अर्जही भरले आहेत. आणि सोमवारी आणखी 11 जागासाठी उमदेवारी अर्ज भरणार असल्याचंही प्रदेश उपाध्यक्ष राजा सरवदेंनी सांगितलं. तर या महायुतीसंदर्भातील निर्णय वरीष्ठ नेतेच घेतील असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सांगत आहेत. सोलापुरातील महायुतीच्या जागावाटपाची चर्चा संपली आहे. यात भाजप 59 तर शिवसेना 43 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे यावरून स्पष्ट होतंय की महायुतीत आरपीआयला चर्चेचं साध निमंत्रणही देण्यात आलं नाही त्यामुळे आपली फरपट रोकण्यासाठी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 29, 2012 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close