S M L

बंडोबा ऐकेना,पक्षाला आवरेना !

30 जानेवारीमहापालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. तसतसे बंडखोर आणि नाराज उमेदवारांचा गदारोळ वाढत चाललाय.काँग्रेसची उमेदवार यादी आज जाहीर होणारेय. पण त्याआधीच काँग्रेसच्या नाराज उमेदवारांनी गोंधळ घातला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या केबिनमध्येच हा गोंधळ झाला. मनसेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोर आणि नाराज उमेदवार रस्त्यावर उतरले. आता या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस असो की मनसे सगळ्याच पक्षांसमोर या बंडोबांना थंड करण्याचं आव्हान आहे. एकंदरीतच बंडखोर कोणाचेही ऐकण्याच्या परिस्थिती नाही आणि सर्वच पक्षांना त्यांना आवर घालणे कठीण होत चाललेले आहे.'मला बंडखोरांची चिंता नाही' काहीशा अतिआत्मविश्वासाने राज ठाकरेंनी संभाव्य बंडखोरांना चुचकारलं. पण यादी जाहीर होताच.. मनसेतल्या नाराजांचा संताप अनावर झाला. ठाण्यात धक्काबुक्कीपर्यंत वेळ गेली. मुंबईत तर नाराजांनी थेट प्रविण दरेकर यांची गाडी अडवली. बंडखोरीचा फटका भाजपलाही बसला आहे. चेंबुरमधल्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयावर हल्ला केला. विश्वनाथ म्हस्के या नगरसेवकानंही तिकीट न मिळाल्याने पक्ष कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत अनेक ठिकाणी जागा न सोडल्याने आरपीआयचेही नेते बंडखोरी करण्याची शक्यता आहे.तर दुसरीकडे गेली 17 वर्ष सत्ते असलेल्या शिवसेनेतही धुसफूस सुरूच आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याविरोधात स्थानिक शाखाप्रमुख अपक्ष म्हणून लढणार आहेत. माटुंग्यातही माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवण्यात आलंय. राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील धुसफूसही बाहेर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसची यादी जाहीर व्हायची असली तरी मुंबई काँग्रेसमधला वाद अजित सावंत यांनी आधीच चव्हाट्यावर आणला आहे. एकूणच, या निवडणुकीत बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वांसमोर असेल. कारण यंदाच्या अटीतटीच्या लढाईत बंडखोर गेमचेंजर ठरू शकतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2012 01:28 PM IST

बंडोबा ऐकेना,पक्षाला आवरेना !

30 जानेवारी

महापालिका निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. तसतसे बंडखोर आणि नाराज उमेदवारांचा गदारोळ वाढत चाललाय.काँग्रेसची उमेदवार यादी आज जाहीर होणारेय. पण त्याआधीच काँग्रेसच्या नाराज उमेदवारांनी गोंधळ घातला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या केबिनमध्येच हा गोंधळ झाला. मनसेची यादी जाहीर झाल्यानंतर बंडखोर आणि नाराज उमेदवार रस्त्यावर उतरले. आता या बंडखोरांना शांत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण काँग्रेस असो की मनसे सगळ्याच पक्षांसमोर या बंडोबांना थंड करण्याचं आव्हान आहे. एकंदरीतच बंडखोर कोणाचेही ऐकण्याच्या परिस्थिती नाही आणि सर्वच पक्षांना त्यांना आवर घालणे कठीण होत चाललेले आहे.'मला बंडखोरांची चिंता नाही' काहीशा अतिआत्मविश्वासाने राज ठाकरेंनी संभाव्य बंडखोरांना चुचकारलं. पण यादी जाहीर होताच.. मनसेतल्या नाराजांचा संताप अनावर झाला. ठाण्यात धक्काबुक्कीपर्यंत वेळ गेली. मुंबईत तर नाराजांनी थेट प्रविण दरेकर यांची गाडी अडवली. बंडखोरीचा फटका भाजपलाही बसला आहे. चेंबुरमधल्या नाराज कार्यकर्त्यांनी पक्षाच्याच कार्यालयावर हल्ला केला. विश्वनाथ म्हस्के या नगरसेवकानंही तिकीट न मिळाल्याने पक्ष कार्यालयावर मोर्चा काढला. मुंबईत अनेक ठिकाणी जागा न सोडल्याने आरपीआयचेही नेते बंडखोरी करण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे गेली 17 वर्ष सत्ते असलेल्या शिवसेनेतही धुसफूस सुरूच आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याविरोधात स्थानिक शाखाप्रमुख अपक्ष म्हणून लढणार आहेत. माटुंग्यातही माजी महापौर मिलिंद वैद्य यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकवण्यात आलंय.

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील धुसफूसही बाहेर येण्याची शक्यता आहे. काँग्रेसची यादी जाहीर व्हायची असली तरी मुंबई काँग्रेसमधला वाद अजित सावंत यांनी आधीच चव्हाट्यावर आणला आहे. एकूणच, या निवडणुकीत बंडोबांना थंड करण्याचे आव्हान सर्वांसमोर असेल. कारण यंदाच्या अटीतटीच्या लढाईत बंडखोर गेमचेंजर ठरू शकतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2012 01:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close