S M L

पु.लं.ची 'म्हैस' एक , सिनेमे बनतायेत तीन !

30 जानेवारीपु.लं.च्या साहित्यिक म्हशीचा नक्की मालक कोण हा वाद आता मराठी सिनेसृष्टीत निर्माण झाला आहे. कारण पु.लं. देशपांडे यांच्या गाजलेल्या म्हैस या कथेवर सध्या तीन सिनेमे तयार होत आहे. त्यातला एक सिनेमा पूर्ण झाला आहे. दुसर्‍याचा मुहूर्त झाला आहेत. तर तिसर्‍या सिनेमाची तयारी सुरु झाली. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 ला गोळाबेरीज या पुस्तकातल्या 'म्हैस' कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा केला आहे. म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचं रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. पण म्हैस या कथेवर आधारित प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचा मुहूर्त नुकताच झाला आहे. तर क्षितिज झारापकर दिग्दर्शित गोळबेरीज हा सिनेमा पु.लंच्या आयुष्यावर बेतलेला असून त्यातही म्हैस पुस्तकाचा संदर्भ आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत पु.लं.ची म्हैस गाजणार असं दिसतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2012 09:39 AM IST

पु.लं.ची 'म्हैस' एक , सिनेमे बनतायेत तीन !

30 जानेवारी

पु.लं.च्या साहित्यिक म्हशीचा नक्की मालक कोण हा वाद आता मराठी सिनेसृष्टीत निर्माण झाला आहे. कारण पु.लं. देशपांडे यांच्या गाजलेल्या म्हैस या कथेवर सध्या तीन सिनेमे तयार होत आहे. त्यातला एक सिनेमा पूर्ण झाला आहे. दुसर्‍याचा मुहूर्त झाला आहेत. तर तिसर्‍या सिनेमाची तयारी सुरु झाली. दिग्दर्शक शेखर नाईक यांनी 2008 ला गोळाबेरीज या पुस्तकातल्या 'म्हैस' कथेचे सर्व हक्क सुनीता देशपांडे यांच्याकडून रीतसर घेतल्याचा दावा केला आहे. म्हैस या नावाने त्यांच्या सिनेमाचं रजिस्ट्रेशन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे केलंय असंही त्यांचं म्हणणं आहे. पण म्हैस या कथेवर आधारित प्रभाकर फिल्म्स निर्मित चांदी या सिनेमाचा मुहूर्त नुकताच झाला आहे. तर क्षितिज झारापकर दिग्दर्शित गोळबेरीज हा सिनेमा पु.लंच्या आयुष्यावर बेतलेला असून त्यातही म्हैस पुस्तकाचा संदर्भ आहे. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत पु.लं.ची म्हैस गाजणार असं दिसतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2012 09:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close